कुटुंबाला विम्याचे पैसे मिळावेत यासाठी व्यवसायिकेने आरोपींच्या हातून आपली हत्या करवून घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. १० जून रोजी दिल्ली पोलिसांना मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापजला होता. यावेळी मृतदेहाचे हात बांधलेले होते असं पोलिसांनी सांगितलं आहे.
९ जून रोजी शानू बन्सल यांनी पोलीस ठाण्यात आपले पती गौरव बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. गौरव यांचा किराणा मालाचा व्यवसाय होता. दुकानात गेलेले गौरव पुन्हा घरी परतलेच नव्हते. शानू यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यात त्यांनी सहा लाखांचं वैयक्तिक कर्ज घेतलं होतं. तसंच मानसिक तणावात असल्याने ते उपचार घेत होते. याशिवाय क्रेडिड कार्ज घोटाळ्याचा त्यांना फटका बसला होता. त्यांच्या कार्डवरुन कोणीतरी साडे तीन लाख रुपये खर्च केले होते.
पोलिसांनी शोध घेतला असता त्यांना मृतदेह आढळला. तपासदरम्यान पोलिसांनी गौरव यांचे फोन रेकॉर्ड तपासले असता ते एका अल्पवयीन मुलाच्या संपर्कात होते असं लक्षात आलं. गौरव यांनी त्याला आपल्या हत्येची सुपारी दिली होती.
९ जून रोजी गौरव घटनास्थळी पोहोचले होते. यावेळी त्यांनी आरोपींना आपलाच फोटो पाठवला आणि हत्येची सुपारी दिली. आरोपींनी त्यांचे दोन्ही हातात बांधले आणि झाडाला लटकवून हत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 15, 2020 6:59 pm