News Flash

बिझनेसमनने मुलांची हत्या करुन मेट्रोसमोर उडी मारुन संपवलं जीवन

आर्थिक चणचणीचा सामना करणाऱ्या या कुटुंबाला मधुरचे आई-वडिल पैशांची मदत करत होते.

बेरोजगारी आणि नैराश्याला कंटाळून एका व्यक्तीने पोटच्या दोन मुलांची हत्या केली व मेट्रो ट्रेनसमोर उडी मारुन जीवन संपवले. रविवारी ही दुर्देवी घटना घडली. मधुर मालानी (४४) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दिल्लीच्या शालीमार बाग परिसरात हे कुटुंब राहत होते. सहा महिन्यापूर्वी बंद पडलेली फॅक्टरी पुन्हा सुरु करण्यासाठी मधुर यांचे प्रयत्न सुरु होते.

आर्थिक चणचणीचा सामना करणाऱ्या या कुटुंबाला मधुरचे आई-वडिल पैशांची मदत करत होते. मधुर यांना एक मुलगी आणि मुलगा होता. पोलिसांनी घरी प्रवेश केला, त्यावेळी दोन्ही मृतदेह बिछान्यावर पडलेले होते. मधुर यांनी गळा आवळून दोन्ही मुलांची हत्या केल्याची शक्यता आहे.

पोलिसांनी मधुर यांचा शोध सुरु केला. पण पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचण्याआधीच मधुर यांनी ५.४० च्या सुमारास हैदरपूर मेट्रो स्टेशनवर आत्महत्या केली. मालानी यांच्या मृतदेहाजवळ किंवा त्यांच्या घरी कुठलीही चिठ्ठी सापडलेली नाही. मधुर यांची पत्नी रुपाली बाजारात गेलेली असताना ही घटना घडली. “मी घरी आली तेव्हा मुले मृतावस्थेत होती व पती घरामध्ये नव्हता” असे रुपालीने पोलिसांना सांगितले.

मालानी यांनी दुपारी मुलांची हत्या केली त्यानंतर आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे. मुलांच्या मृत्यूचे नेमके कारण पोलिसांनी अजून स्पष्ट केलेले नाही. शवविच्छेदन अहवालातूनच नेमके कारण स्पष्ट होईल असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2020 6:14 pm

Web Title: delhi businessman kills his children commits suicide dmp 82
Next Stories
1 #Coronovirus: कोरोना व्हायरसचं सत्य जगासमोर आणणारा चीनमधील पत्रकार रहस्यमयरित्या बेपत्ता
2 कुमारस्वामीच्या मुलाचा काँग्रेस नेत्याच्या भाचीसोबत साखरपुडा
3 असक्षम डॉक्टरांकडून अर्थव्यवस्थेची हातळणी : चिदंबरम
Just Now!
X