News Flash

बीवी हो तो ऐसी : जीव घेण्यासाठी आलेल्या पतीला असं वाचवलं, काय घडलं नेमकं?

CCTV कॅमेऱ्यात घटना कैद

राजधानी दिल्लीतील त्रिलोकपुरी परिसरातील CCTV कॅमेऱ्यात एक अजब घटना कैद झाली. ज्यामध्ये रागाच्या भरात पती पत्नीला मारण्यासाठी पेट्रोल घेउन आला आहे. पत्नीच्या आणि स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी त्या व्यक्तीलाच आग लागली. त्याचवेळी पत्नीने नवऱ्याचा जीव वाचवला. आगीमुळे पती जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

आज तक ने दिलेल्या वृत्तानुसार, जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आरिफ असे आहे. लॉकडाउनमध्ये ३५ वर्षीय आरिफ मेरठमध्येच अडकला होता. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर आरिफ दिल्लीतील आपल्या घरी परतला. आरिफ आणि त्याच्या पत्नीमध्ये सतत वाद होत होते. मेरठहून परतल्यानंर आरिफने हा वाद कायमचा मिठवायचा ठरवलं त्यासाठी पत्नीला आणि स्वत मरायचा निर्णय घेतला.

पेट्रोल टाकून पत्नी आणि स्वत:ला जाळण्यासाठी आरिफ पेट्रोल घेऊन आला. आरिफने स्वत: आणि पत्नीवर पेट्रोल शिंपडले. नवऱ्याचा हेतू लक्षात घेऊन पत्नीने आपला जीव वाचवला. पण त्याचवेळी आरिफच्या कपड्यांनी पेट घेतला. पत्नीनं आरिफच्या अंगावर ब्लॅकेट टाकून तात्काळ आग विझवली. त्यानंतर जखमी झालेल्या आरिफला उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2020 11:57 am

Web Title: delhi cctv petrol burn wife husband burnt himself hospital nck 9
Next Stories
1 केरळमध्ये अजून एका हत्तीणीची त्याच क्रुरतेने हत्या झाल्याचा संशय
2 केंद्र सरकारनं तात्काळ लक्ष दिलं तर बरं होईल; मायावतींनी व्यक्त केली चिंता
3 केरळमध्ये गर्भवती हत्तीणीचा मृत्यू, मनेका गांधी संतापल्या; राहुल गांधींवर साधला निशाणा
Just Now!
X