09 April 2020

News Flash

अरविंद केजरीवालांच्या गाण्याचा व्हिडिओ झाला व्हायरल!

व्हिडिओमध्ये केजरीवाल 'दूर गगन की छांव में' चित्रपटातील गाणे गाताना दिसतात.

पंजाबमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील लोकांमध्ये असलेले गाण्याप्रतीचे प्रेम लक्षात घेऊन आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या आवाजातले एक गाणे सादर केले आहे. अरविंद केजरीवाल यांनी गायलेल्या या गाण्याचा व्हिडिओ आपतर्फे समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात येत आहे. या व्हिडिओमध्ये केजरीवाल ‘दूर गगन की छांव में’ चित्रपटातील गाणे गाताना दिसतात. मूळ किशोर कुमार यांच्या आवाजातील या गाण्याचे बोल बदलण्यात आले आहेत. नवीन बोल काहीसे असे आहेत – ‘एक ऐसे गगन के तले, जहां चोर भी ना हों, जहां भ्रष्ट भी ना हों, बस आप का राज चले’

या आधी कुमार विश्वास यांनीदेखील ‘एक नशा’ हे गाणे गायले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2016 5:13 pm

Web Title: delhi chief minister arvind kejriwal sings for punjab
Next Stories
1 न्यायसंस्थेने स्वत:साठी लक्ष्मणरेषा आखून घेतली पाहिजे- जेटली
2 BLOG : अॅमेझॉनला आला पूर!
3 रिझर्व्ह बँक आणि वित्त मंत्रालयात परिपक्व संबंध – जेटली
Just Now!
X