News Flash

केजरीवालांनी मारले एका दगडात दोन पक्षी; भाजपसह काँग्रेसवर साधला निशाणा

भाजप आणि काँग्रेसला मिळणारा ८० टक्के निधी हा काळ्यापैशातून मिळतो.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल.

देशातील चलन कलहाच्या  पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. पैशाच्या माध्यमातून चालणारे व्यवहार एका रात्रीत बदलता येत नसल्याचे सांगत केजरीवालांनी नोटाबंदीवरील निर्णयावर टीकास्र सोडले. ‘एनडीटिव्ही’ या वृत्तवाहिनीवरील चर्चसत्रात अरविंद केजरीवाल यांनी भाजपसह काँग्रेसवर टीकास्र सोडले. देशातील भ्रष्ट्राचार बंद झालेला नसल्याचे सांगत काँग्रेसची जागा आता भाजपने घेतल्याचे सांगत केजरीवालांना एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. सरकारने घेतलेल्या निर्णयाचा फटका मोठ्या प्रमाणात गरिब जनतेला सहन करावा लागत आहे. मात्र सरकार बँकासमोरिल नागरिकांच्या लागलेल्या रांगांकडे अच्छे दिन दाखविणारे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

सरकारने भ्रष्टाचार बंद करण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यामुळे तब्बल ८ लाख कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा देखील केजरीवालांनी केला. बड्या उद्योगपतींची कर्जे माफ का केली? दोन वर्षापासून आयकर विभागातील कागद पत्रांची तपासणीमध्ये सरकार टाळाटाळ का करत आहे. असे सवाल केजरीवालांनी यावेळी उपस्थित केले. आमची पार्टी पाच रुपयाचा देखील हिशोब जनतेला देते असे सांगत राकीय पक्षांनी आपल्या निधीचा हिशोब जाहिर करावा असे केजरीवालांनी म्हटले आहे. भाजप आणि काँग्रेसला मिळणारा ८० टक्के निधी हा काळ्यापैशातून प्राप्त होतो असा आरोप देखील केजरीवालांनी केला.

पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद करण्यावरून संसदेत देखील गदारोळ उडाल्याचे दिसून आले होते. नोटाबंदीच्या निर्णयाच्या विरोधात लोकसभा आणि राज्यसभेत कामकाज सुरळीत पार पडू शकले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच सभागृहात येऊन उत्तर दिले पाहिजे, यावर विरोधक आक्रम झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2016 8:10 pm

Web Title: delhi chief minister arvind kejriwal speaks on currency ban
Next Stories
1 नोटाबंदीनंतर बनावट नोटांचा धंदा पूर्णपणे ठप्प: रिजिजू
2 नोटाबंदीचा निर्णय उत्तम, मात्र अंमलबजावणी नियोजनशून्य- शत्रुघ्न सिन्हा
3 ‘चलनकल्लोळ’वरून सोशल मीडियावर उमटतोय संताप!
Just Now!
X