लोकसभा निवडणुका येत्या काही दिवसांमध्ये जाहीर होतील. अख्खा देश मोदींना पळवून लावण्याच्या तयारीत आहे, कारण संपूर्ण देशालाच मोदी नकोसे झालेत. मात्र तुमचे मत देताना विचार करा, मोदींना पदावरून घालवायचे यासाठी काँग्रेसला मतदान करू नका. तुमच्यासमोर आपचा सक्षम पर्याय आहे. आपला मतदान करा असे आवाहन करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. आपला मतदान करा आणि यावेळी दिल्लीतील लोकसभेच्या सर्व सातही जागी आप या पक्षाचेच खासदार बसवा असंही आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे.

आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला चांगलाच हादरा दिला होता. त्यानंतर केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. मात्र त्याआधीपासूनच ते पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आणि भाजपावर टीका करताना दिसत आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पदावरून हटवण्याची सगळ्या देशाची इच्छा आहे. त्यामुळे त्यांना मतदान करू नकाच, पण त्यांना हटवायचे म्हणून काँग्रेसलाही मतं देऊ नका आप हा तुमच्यापुढे सक्षम पर्याय आहे असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.