News Flash

दिल्लीकरांना मिळणार मोफत लस; मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा

दिल्ली सरकारकडून १.३४ कोटी लसींची ऑर्डर

छायाचित्र सौजन्य: एएनआय

देशातील करोना संकट पाहता दिल्ली सरकारनं १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. लसीकरण वेगाने व्हावं यासाठी दिल्ली सरकारने १.३४ कोटी लसींची ऑर्डर दिली आहे. १ मे पासून दिल्लीत लसीकरण मोठ्या प्रमाणात केलं जाईल असंही मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितलं. मोफत लसीकरणाचा दिल्लीतील सामान्य जनतेला फायदा होईल असंही त्यांनी पुढे सांगितलं.

यावेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लसींच्या दरावरून टीकेची झोड उठवली. केंद्र, राज्य आणि खासगी रुग्णालयांना एकाच किंमतीत लस मिळाली पाहीजे अशी आग्रही मागणी त्यांनी केली. लस निर्मिती करण्य़ाऱ्या कंपन्याचा दावा आहे की, १५० रुपये फायदा होतो.मग वेगवेगळे दर का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. नफा कमवण्यासाठी पूर्ण आयुष्य पडलं आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच केंद्र सरकारने यात दखल घेत दर निश्चित केले पाहीजेत अशी सूचनाही केली.

लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याचं जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे सीरम इंस्टीट्यूट आणि भारत बायोटेकनं लसींचे दर निश्चित केले आहेत. यात कोविशील्ड राज्य सरकारला ४०० रुपये, खासगी रुग्णालयांना ६०० रुपयात मिळणार आहे. तर कोवॅक्सिन राज्य सरकारला ६०० रुपये, खासगी रुग्णालयांना १२०० रुपयात मिळणार आहे. दूसरीकडे ही लस केंद्र सरकारला १५० रुपयात दिली जाणार आहे. त्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

मोफत लसीकरणाचं ट्विट आदित्य ठाकरेंनी डिलीट केल्याच्या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले…

भारतात गेल्या २४ तासांत ३ लाख ५२ हजार ९९१ करोना रुग्ण आढळले असून यासोबत एकूण रुग्णसंख्या १ कोटी ७३ लाख १३ हजार १६३ इतकी झाली आहे. तर २८१२ जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत १ लाख ९५ हजार १२३ जणांना करोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान गेल्या २४ तासांत २ लाख १९ हजार २७२ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. आतापर्यंत १ कोटी ४३ लाख ४ हजार ३८२ जणांनी करोनावर मात केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2021 12:40 pm

Web Title: delhi cm chief minister arvind kejriwal announced free vaccination in delhi rmt 84
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 Coronavirus : रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने गाडीच्या टपावर बांधून स्मशानात नेला बापाचा मृतदेह
2 दिल्ली हिंसाचारातील आणखी एका प्रकरणात दीप सिद्धूला जामीन
3 विडी कामगाराने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले २ लाख रुपये; म्हणाला, ‘मी विड्या वळून…’
Just Now!
X