देशात करोनाची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये लॉकडाउनच्या निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे. दिल्लीतही गेल्या काही दिवसात करोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. दिल्लीत सोमवारी ८९ करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ११ जणांचा मृत्यू झाला आहे. करोना रुग्णवाढीचा दरही ०.१६ टक्क्यांवर आला आहे. तसेच १७३ जणांनी करोनावर मात केली आहे. दिल्लीत आता सक्रिय करोना रुग्णांची संख्य़ा २ हजारांच्या खाली आली आहे. दिल्ली आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

दिल्लीत सोमवारी ८९ करोना रुग्णांची नोंद झाल्यानंतर रुग्णांचा एकूण आकडा १४ लाख ३२ हजार ३८१ वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत १४ लाख ५ हजार ४६० जणांनी करोनावर मात केली आहे. दिल्लीत करोनामुळे आतापर्यंत २४ हजार ९२५ जणांचा मृत्यू झाला. दिल्लीतील मृत्यूदर १.७४ टक्के इतका आहे. दिल्लीत मागच्या २४ तासात ५७ हजार १२८ जणांची करोना चाचणी करण्यात आली. त्यात ११ हजार ६६० जणांची अँटिजेन चाचणी केली गेली. देशातील मृतांच्या आकडेवारीत दिल्ली चौथ्या स्थानावर आहे.

८०० किलो शेण चोरीला; छत्तीसगड पोलीस घेत आहेत शोध 

दिल्लीत मागच्या २४ तासात ११ हजार ६६२ जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे. यात १० हजार ४३ जणांना करोना लसीचा पहिला डोस, तर १ हजार ६१९ जणांना करोना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. दिल्लीत आतापर्यंत ६५ लाख २१ हजार ९५९ जणांना करोनाची लस देण्यास आली आहे. त्यात ४९ लाख ४२ हजार २६७ जणांना करोना लसीचा पहिला डोस, तर १५ लाख ७९ हजार ६९२ जणांना करोना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.

केळी तीन हजार रुपये किलो, काफीचं पाकिट सात हजाराला; किम जोंग उन यांच्यासमोर नवं संकट

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी लॉकडाउन शिथिल करण्याचा निर्णय घेतला. देशात गेल्या काही दिवसात करोना रुग्ण संख्येत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या कमी असलेल्या राज्यांमध्ये लॉकडाउनच्या निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली आहे. ICMR च्या माहितीनुसार आतापर्यंत देशात ३९,२४,०७,७८२ करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर गेल्या २४ तासात १३,८८,६९९ करोना चाचण्या करण्यात आल्या. रविवारी देशात ५२,२५६ नवीन करोना रुग्ण सापडले. तर ७७,१९० रुग्णांनी करोनावर मात केली आहे. करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत देखील घट होतं असल्याचं दिलासादायक चित्र आहे. देशात काल (रविवार) १४२२ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. नवीन आढळलेल्या बाधितांची संख्या ८८ दिवसांपासून सर्वाधिक कमी आहे. यापुर्वी २३ मार्चला ४७,२३९ रूग्ण आढळले होते. त्यानंतर करोना संसर्गाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला.