28 November 2020

News Flash

पती घरात पुतणीची हत्या करत असताना पत्नी घराबाहेर देत होती पहारा, धक्कादायक घटनेने पोलीसही चक्रावले

बलात्काराचा प्रयत्न फसल्याने हत्येचा निर्णय

बलात्काराचा प्रयत्न फसल्यानंतर काकानेच आपल्या १७ वर्षीय पुतणीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलगी शिक्षणासाठी आपला काका वकील पोदार आणि काकीसोबत राहत होती. हत्या केल्यानंतर मुलीचा मृतदेह बेड बॉक्समध्ये लपवून ठेवला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दिल्लीमधील नंदगिरी परिसरात गेल्या महिन्यात हा प्रकार घडला.

२३ ऑक्टोबरपासून मुलगी बेपत्ता होती. दांपत्याच्या घरी बेड बॉक्समध्ये सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. मुलीची काकी भिक्षा मागण्याचं काम करत असून २३ ऑक्टोबरला आपण घरी परतल्यानंतर ती घरात नव्हती असं सांगितलं. पतीकडे चौकशी केली असता त्याने आपण मुलीला उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील अनाथआश्रमात सोडल्याचं सांगितलं असा दावा तिने केल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी चौकशी केली असता तिथे अशी कोणतीही मुलगी नसल्याचं समोर आलं.

तपासादरम्यान वकील पोदार बेपत्ता असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं आणि यावरुन संशय वाढला. बिहारमधील बस स्थानकावरुन पोलिसांनी त्याला अटक केली. “पीडित मुलगी आरोपीच्या वहिनीच्या मुलगी होती. त्याने तिच्याशी शारिरीक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला असता तिने विरोध केला होता. पत्नीला कळालं असता दोघांमध्ये वादही झाला होता. मुलीने तिथेच राहावं अशी आरोपीची इच्छा होती. पण नंतर तिला तिच्या गावी पाठवण्याचा निर्णय झाला. पीडित मुलगी मात्र शिक्षण पूर्ण करायचं असल्याने तेथून जाण्यास तयार नव्हती,” असं पोलिसांनी सांगितलं आहे.

आणखी वाचा- माहेरी गेलेल्या पत्नीचा प्रियकर असल्याचं कळताच आधी प्रियकराची हत्या केली; नंतर…

पीडित मुलीमुळे वकील पोदार आणि त्याच्या पत्नीमध्ये खूप वाद होत होते. अखेर एकदा पत्नीने तिची हत्या करा असंही सांगितलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. “२३ ऑक्टोबरला आरोपीने लोखंडी रॉडने मुलीवर हल्ला करुन हत्या केली. यावेळी पत्नी बाहेर उभी होती. हत्या केल्यानंतर मृतदेह बेड बॉक्समध्ये लपवून ठेवला आणि सर्व रुम स्वच्छ केली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची योजना होती, पण त्यांना संधी मिळाली नाही. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी आरोपीने दिल्ली सोडली होती,” असं पोलिसांनी सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2020 9:16 am

Web Title: delhi couple kills niece to hide rape attempt sgy 87
Next Stories
1 US Election : आज मतदान; राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा विराजमान होणार का ट्रम्प?
2 “रोजगारासाठी नाही तर हौस म्हणून बिहारमधील लोक मुंबई-दिल्लीला जातात”
3 ऑस्ट्रियामध्ये दहशतवादी हल्ला, सहा ठिकाणी गोळीबार; १५ जखमी
Just Now!
X