News Flash

Batla House Encounter : दिल्ली न्यायालयाने अरिझ खानला दोषी ठरवले

चकमकीमध्ये इंस्पेक्टर मोहन चंद शर्मा आणि दोन दहशतवादी ठार झाले होते

छायाचित्र सौजन्य: इंडियन एक्सप्रेस

सप्टेंबर २००८ मध्ये राष्ट्रीय राजधानीत झालेल्या बाटला हाऊस चकमकीत झाली होती यात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे इन्स्पेक्टर मोहन चंद शर्मा यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी अरिझ खान याला दिल्ली न्यायालयाने सोमवारी दोषी ठरवले. अरिझ खानचे दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिद्दीनशी संबंधित असल्याचे कोर्टांने सांगितले आहे.

लाइव्ह लॉनुसार अतिरिक्त सत्र न्यायाधीश संदीप यादव यांनी निकाल जाहीर करताना सांगितले की, “फिर्यादींनी दिलेल्या पुराव्यांवरून हा खटला सिद्ध झाला आहे आणि आरोपीला दोषी आहे यात काही शंका नाही. हे सिद्ध झाले आहे की आरोपी अरिझ खान शूटआऊट दरम्यान पळून जाण्यात यशस्वी झाला आणि त्याला कोर्टात हजर होण्याचा आदेश देवूनही तो हजर झाला नाही. त्यानुसार आरोपीस भारतीय दंड संहिता कलम १८६, ३३३, ३५३, ३०२, ३०७,१७४ए, ३४ए आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम २७ अंतर्गत दोषी ठरविण्यात आले आहे. ”

१५ मार्च रोजी कोर्टाची शिक्षा किती प्रमाणात होईल यावर युक्तिवाद सुनावणी होईल.

१९ सप्टेंबर २००८ रोजी दक्षिण दिल्लीच्या बाटला हाऊसमधील फ्लॅट (एल -१८) येथे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल आणि कथित दहशतवाद्यांमध्ये चकमक घडली. राजधानीत झालेल्या बॉम्बस्फोटांच्या सहा दिवसानंतर ही घटना घडली यात २६ लोक ठार झाले होते. या चकमकीमध्ये इंस्पेक्टर शर्मा आणि दोन दहशतवादी ठार झाले.

जुलै २०१३ मध्ये कोर्टाने इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी शहजाद अहमद याला या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ट्रायल कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात त्याची याचीका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. चकमकीतून पळून गेलेल्या अरिझला फेब्रुवारी २०१८ मध्ये नेपाळमधून अटक करण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2021 4:08 pm

Web Title: delhi court convicts ariz khan for killing inspector mohan chand sharma in batla house encounter sbi 84
Next Stories
1 ग्रामीण महिलांमधून उद्योजक घडवण्यासाठी गुगल मदत करणार; पाच लाख डॉलरचे अनुदान
2 फ्रान्स, बेल्जियम, ऑस्ट्रियापाठोपाठ आता स्वित्झर्लंडमध्येही ‘बुरखा बंदी’; जनमत चाचणीनंतर घेतला निर्णय
3 सब-इन्स्पेक्टरचा पोलिस ठाण्याच्या आवारातच महिलेवर बलात्कार
Just Now!
X