देशद्रोहाचे आरोप असलेल्या जेएनयू विद्यापीठातील उमर खालिद आणि अनिर्बन भट्टाचार्य यांना दिल्ली न्यायालयाने शुक्रवारी सहा महिन्यांच्या अंतरिम जामीन मंजूर केला. या खटल्यातील प्रमुख आरोपी कन्हैया कुमार याला यापूर्वीच न्यायायाने अंतरिम जामीन मंजूर झाला आहे.
अफजल गुरूला संसद हल्ला प्रकरणात फाशी दिल्याच्या विरोधात जवाहरलाल नेहरू विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात देशविरोधी घोषणाबाजी करण्यात आली होती. या विद्यार्थ्यांमध्ये सामील असल्याचा आरोप असलेल्या उमर खालीद व अनिर्बन भट्टाचार्य या दोन विद्यार्थ्यांनी २४ फेब्रुवारीला पोलिसांपुढे शरणागती पत्करली होती. सुरुवातीला त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती.