मावळते दूरसंचारमंत्री कपिल सिब्बल यांचा पुत्र अमित याने दाखल केलेल्या बदनामीच्या खटल्यास अनुपस्थित राहिल्याबद्दल दिल्ली न्यायालयाने शनिवारी ‘आप’च्या माजी नेत्या शाजिया इल्मी यांच्यावर जामीनपात्र वॉरण्ट बजावले आहे.आपचे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, अन्य नेते मनीष सिसोदिया, प्रशांत भूषण आणि शाजिया इल्मी यांना न्यायालयात अनुपस्थित राहण्याबद्दल गेल्याच महिन्यांत न्यायालयाने चांगलेच फटकारले होते.