25 February 2021

News Flash

रॉबर्ट वढेरा यांचे जाबजबाब घेण्यास स्थगिती नाही

वढेरा हे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे मेहुणे व काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती आहेत.

| February 26, 2019 03:32 am

संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : काळ्या पैशाच्या प्रकरणातील आरोपी रॉबर्ट वढेरा यांच्या जाबजबाबास स्थगिती देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला असून मंगळवारी सक्तवसुली संचालनालय करीत असलेल्या चौकशीत सहभागी होण्याचा आदेश त्यांना देण्यात आला आहे.

विशेष सीबीआय न्यायाधीश अरविंद कुमार यांनी वड्रा यांच्या निवासस्थानावरील गेल्या वर्षीच्या छाप्यात जी कागदपत्रे जप्त करण्यात आली त्याच्या छायांकित प्रती त्यांना देण्यात याव्यात, असा आदेश सक्तवसुली संचालनालयाला दिला आहे. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी आता २ मार्चला ठेवली आहे, सक्तवसुली संचालनालय घेत असलेल्या जाबजबाबांना स्थगिती देण्याची मागणी वढेरा यांनी याचिकेत केली आहे. वढेरा हे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे मेहुणे व काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती आहेत. त्यांनी न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात म्हटले आहे की, सक्तवसुली संचालनालयाने गेल्या वर्षी आपल्या घरावर जे छापे टाकले होते त्यात काही कागदपत्रे जप्त केली होती. त्याच्या आधारे जाबजबाब घेतले जात असून त्या कागदपत्रांच्या छायांकित प्रती उपलब्ध करून द्याव्यात.  त्यावर न्यायालयाने सांगितले होते,की वढेरा यांच्या या विनंतीवर सुनावणी झाल्यानंतर ते जाबजबाबात सहभागी होतील.  वढेरा यांचे वकील केटीएस तुलसी यांनी असा आरोप केला, की सक्तवसुली संचालनालयाने निवडणुका जवळ आल्याने वढेरा यांच्या चौकशीस वेग दिला आहे.

राजकारण प्रवेशाची घाई नाही – वढेरा

नवी दिल्ली : जनतेची सेवा करण्यासाठी मोठी भूमिका वठविण्याचे संकेत यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉवर्ट वढेरा यांनी दिले. मात्र त्यासाठी राजकीय मार्ग स्वीकारण्याची आपल्याला घाई नाही, असेही वढेरा यांनी स्पष्ट केले. उत्तर प्रदेशातील मोरादाबाद येथे वढेरा यांचे छायाचित्र असलेली पोस्टर्स झळकली आणि त्यावर निवडणूक लढण्यासाठी स्वागत असो, असा मजकूर प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर वढेरा यांनी वरील बाब स्पष्ट केली. आपल्याविरुद्ध सुरू असलेल्या खटल्यांचा निकाल लागल्यानंतर सार्वजनिक जीवनात मोठी भूमिका वठविण्याचे संकेत वढेरा यांनी रविवारी फेसबुकवर दिले. त्यामुळे ते राजकारणात सक्रिय होणार असल्याच्या शक्यतांना उधाण आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2019 3:32 am

Web Title: delhi court refuses to stay interrogation of robert vadra
Next Stories
1 पुलवामा हल्ल्यात वापरलेल्या गाडीचा  मालक बेपत्ता
2 पॅराडाईजप्रकरणी प्राप्तिकर खात्याकडून अखेर खटले दाखल
3 ‘अदानी’ला पाच विमानतळांचे कंत्राट
Just Now!
X