X

पाच वर्षांच्या मुलीबरोबर पुजाऱ्याचे दुष्कृत्य

पुजाऱ्याने मुलीला मंदिराच्या मागील बाजूस निर्जन ठिकाणी नेऊन तिच्याशी दुष्कृत्य केले.

दिल्लीतील भलस्वा डेअरी परिसरातील ४५ वर्षीय राजेश शुक्ला नावाच्या पुजाऱ्याला पाच वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मुळचा उत्तर प्रदेशातील असलेला राजेश अन्य पुजाऱ्यांबरोबर मंदिराच्या परिसरातच राहत होता. बुधवारी संध्याकाळी मुलीने पाटोत दुखत असल्याची तक्रार केली असता सदर घटना समोर आल्याची माहिती मिळते. दोन दिवसांपूर्वी मंदिरात गेली असता मंदिरातील पुजाऱ्याने आपल्यासोबत दुष्कर्म केल्याची माहिती तिने आईला दिली. नंतर मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. पुजाऱ्याने मुलीला मंदिराच्या मागील बाजूस निर्जन ठिकाणी नेऊन तिच्याशी दुष्कृत्य केल्याची माहिती वायव्य दिल्लीचे अतिरिक्त पोलिस आयुक्त विजय सिंह यांनी दिली. राजेशवर भारतीय दंडविधान संहितेतील कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Tags: minor-girl-raped, rape, sexual-assault,
  • वाचा / प्रतिक्रिया द्या
    Outbrain