News Flash

“अगला स्टेशन सुप्रीम कोर्ट…”, ‘या’ मेट्रो स्थानकाला मिळणार सुप्रीम कोर्टाचं नाव

नामांतराची पूर्ण प्रक्रिया तसंच मेट्रो ट्रेनमध्ये होणारी उद्घोषणा यासाठी महिन्याभराचा कालावधी लागेल

संग्रहित छायाचित्र

दिल्लीमधील प्रगती मेट्रो स्टेशन यापुढे सुप्रीम कोर्ट मेट्रो स्टेशन या नावाने ओळखलं जाणार आहे. दिल्ली सरकारने प्रगती मेट्रो स्टेशनचं नाव बदलून सुप्रीम कोर्ट मेट्रो स्टेशन करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेदरम्यान यासंबंधी घोषणा केली. यावेळी त्यांनी नामांतराची पूर्ण प्रक्रिया तसंच मेट्रो ट्रेनमध्ये होणारी उद्घोषणा यासाठी महिन्याभराचा कालावधी लागेल अशी माहिती दिली.

मनिष सिसोदिया यांनी यावेळी मुबारक चौकाला शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांचं नाव देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. “मुबारक चौक आणि फ्लायओव्हरचं नामांतर करुन शहीद कॅप्टन विक्रम बत्रा चौक असं करण्यात आलं आहे. कॅप्टन विक्रम बत्रा कारगिल युद्धात शहीद झाले होते,” असं मनिष सिसोदिया यांनी यावेळी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 10:03 am

Web Title: delhi deputy chief minister manish sisodia pragati maidan metro station supreme court metro station sgy 87
Next Stories
1 नववर्षाची भेट; जम्मू काश्मीरमध्ये एसएमएस, इंटरनेट सेवा सुरू
2 २०१९ मध्ये भारतात ११० वाघांचा तर ४९१ बिबट्यांचा मृत्यू – रिपोर्ट
3 Welcome 2020 : जगभरात नववर्षाचं जल्लोषात स्वागत
Just Now!
X