24 October 2020

News Flash

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना करोना पाठोपाठ डेंग्यूचीही लागण

बुधवारीच त्यांना करोनामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं

संग्रहित (PTI)

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना करोना पाठोपाठ डेंग्यूचीही लागण झाली आहे. एवढंच नाही तर त्यांच्या प्लेटलेट्सची संख्याही ढासळते आहे. त्यांना दिल्लीतील लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र आता त्यांना मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे अशीही माहिती एएनआयने दिली आहे. बुधवारी मनिष सिसोदिया यांची ऑक्सिजन लेव्हल कमी झाली आणि ताप आला त्यामुळे त्यांची करोना चाचणी करण्यात आली जी पॉझिटिव्ह आली आहे. कालच ही माहिती समोर आली होती. आता त्यांना डेंग्यू झाल्याचीही माहिती समोर आली आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

१४ सप्टेंबरला त्यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर फार काही त्रास होत नसल्याने ते होम क्वारंटाइनच होते. मात्र काल त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. ज्यानंतर त्यांना तातडीने लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आज त्यांची डेंग्यूचीही चाचणी करण्यात आली. त्यांना डेंग्यू झाल्याचीही माहिती चाचणीचा अहवाल आल्यानंतर स्पष्ट झाली आहे. यानंतर काही वेळापूर्वीच त्यांना लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयातून मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2020 9:29 pm

Web Title: delhi deputy cm manish sisodia is suffering from dengue his blood platelets count is falling he has also tested corona positive scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती अत्यंत नाजूक, रुग्णालयाची माहिती
2 दिल्लीत करोनाची दुसरी लाट येऊन गेली; अरविंद केजरीवाल यांचा दावा
3 ड्रॅगनची कोंडी: …तो पर्यंत भारतीय सैन्य ‘त्या’ भागातून एक पाऊलही मागे हटणार नाही
Just Now!
X