News Flash

दिल्लीच्या जनतेला केजरीवाल सरकारचा मोठा दिलासा, प्रतिलिटर डिझेल आठ रुपयांनी स्वस्त

व्यापारी, उद्योजकांच्या मागणीला सरकारचा प्रतिसाद

संग्रहित छायाचित्र

दिल्ली सरकारने तिथल्या जनतेला मोठा दिलासा दिला आहे. डिझेलवरील वॅटमध्ये मोठी कपात केली आहे. दिल्ली सरकारने डिझेलवर आकारण्यात येणारा वॅट कर ३० टक्क्यावरुन १६.७५ टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिल्लीत डिझेलचे दर ८२ वरुन ७३.६४ रुपये होणार आहेत. दिल्लीत प्रतिलिटर डिझेलवर ८.३६ रुपये कमी होणार आहेत, अशी घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली.

“मंत्रिमंडळाच्या बैठकीत डिझेलवरील वॅट कर ३० वरुन १६.७५ टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे दिल्लीत डिझेलचे दर ८२ वरुन ७३.६४ होणार आहेत” अशी माहिती केजरीवाल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

“दिल्लीची अर्थव्यवस्था पुनर्जीवित करणे एक मोठे आव्हान आहे. पण जनतेच्या सहकार्याने हे साध्य करु” असे अरविंद केजरीवाल म्हणाले. दिल्लीत आता प्रतिलिटर डिझेलचा दर ८२ ऐवजी ७३.६४ रुपये असेल. दिल्लीतील व्यापारी आणि उद्योजकांनी दर कमी करण्याची मागणी केली होती असे केजरीवाल म्हणाले. डिझेलच्या वाढत्या दरांमुळे महागाईचा सुद्धा भडका उडतो. आता डिझेलचे दर कमी करुन महागाई नियंत्रणात ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2020 1:41 pm

Web Title: delhi diesel price cut by rs 8 per litre announces arvind kejriwal dmp 82
Next Stories
1 धक्कादायक! अमेरिकेत हॉस्पिटलबाहेर भारतीय नर्सची हत्या, नवऱ्याने तीक्ष्ण हत्याराने केले वार
2 रिलायन्सचं मुख्यालय बँक घेणार ताब्यात; २९०० कोटींच्या कर्जप्रकरणी अनिल अंबानींना दणका
3 म्यानमार सीमेजवळ भारतीय लष्कराच्या तुकडीवर दहशतवाद्यांचा घातकी हल्ला, तीन जवान शहीद
Just Now!
X