26 October 2020

News Flash

मतदारांसाठी आता ‘व्होट फ्रॉम होम’ सुविधा

तसंच मतदारांना माहिती मिळण्यासाठी एक अॅपही तयार करण्यात आलं आहे.

दिल्लीत वास्तव्यास असलेल्या जेष्ठ मतदारांसाठी आता निवडणूक आयोगानं नवी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ८० वर्षे किंवा त्यावरील तसंच दिव्यांग मतदारांच्या सोयीसाठी निवडणूक आयोगानं ‘व्होट फ्रॉम होम’ ही सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अशा मतदारांना आता मतदान केंद्रावर न जाता घरबसल्या मतदान करता येणार आहे. दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकीपासून या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. याव्यतिरिक्त दिल्लीतील १.४४ कोटी मतदारांना आपल्या मतदान केंद्रांवर किती मोठी रांग आहे, तसंच किती मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला याची माहितीही मिळणार आहे.

व्होटर व्हेरिफिकेशन कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर सोमवारी निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या टीमनं एक दौरा केला होता. या टीमनं सर्व निवडणूक अधिकारी, पोलीस आणि अन्य विभागांच्या अधिकाऱ्यांसह बैठक घेतल्याची माहिती दिल्ली निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. रणबीर सिंह यांनी दिली. या बैठकीत त्यांनी ८० वर्षांपेक्षा अधिक वय असलेले तसंच दिव्यांग मतदारांची नावं व्हेरिफाय करण्याचे आदेश दिले असल्याचेही ते म्हणाले. तसंच यावेळी मतदारांसाठी एक नवं अॅप लाँच करण्यात येणार आहे. बूथ अॅप असं या अॅपचं नाव असेल. या अॅपद्वारे कोणताही मतदार आपल्या मतदान केंद्रावर किती मोठी रांग आहे किंवा कोणी आतापर्यंत किती मतदान केलं याची माहिती घेऊ शकतो.

कसं काम करेल हे अॅप?
मतदान केंद्रांवर कोणताही मतदार मतदान करण्यासाठी आला तर हेल्प डेस्कनजीक त्याचा फोटो आणि ओळखपत्र स्कॅन करून घेतलं जाईल. याद्वारे कोणती व्यक्ती मतदानासाठी गेली याची माहिती अॅपवर मिळेल. त्या मतदान केंद्रांवर किती मतदारांची नोंदणी आहे आणि किती मतदारांनी मतदान केलं आहे, याची माहिती याद्वारे मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2019 11:05 am

Web Title: delhi election commission launched vote from home program for senior citizen and handicapped voters jud 87
Next Stories
1 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
2 भारताकडे प्रत्यार्पण केल्यास आत्महत्या करेन; नीरव मोदीची धमकी
3 नीरव मोदीचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला
Just Now!
X