दिल्ली विधानसभा निवडणूकांच्या रणधुमाळीत प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भारतीय जनता पक्षाने (भाजप) पत्रकार परिषद घेऊन यावेळी दिल्लीवर शंभर टक्के भाजपची सत्ता असेल असा विश्वास व्यक्त केला.
लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज म्हणाल्या, दिल्लीत आम्ही बहुमताने निवडणून येऊ याचा आम्हाला विश्वास आहे. काँग्रेस प्रशासनाला दिल्लीकर त्रस्त झाला आहे. तसेच दिल्लीत प्रत्येक भाजप नेता पक्षासाठी कठोर मेहनत घेत आहे. त्यामुळे याचे फळ आम्हाला नक्की मिळेल.” अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षावर टीका करत सुषमा स्वराज म्हणाल्या, “आम आदमी पक्षाला मत देणे म्हणजे मतदानाचा अधिकार वाया घालविण्यासारखे आहे.” तसेच ‘आम आदमी’ पक्षावर भाजप नेते अरूण जेटली यांनीही टीकेची झो़ड उठवत आम आदमी पक्ष सध्या स्वप्नांच्या दुनियेत रंगला आहे. दिल्ली विधानसभेत निवडून येण्याची त्यांची कोणतीही शक्यता नाही. असेही जेटली म्हणाले.