संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱया दिल्लीतील सामूहिक बलात्कार घटनेचा घटनाक्रम पुढीलप्रमाणे…

  • १६ डिसेंबर २०१२ रोजी रात्री एका बालगुन्हेगारासह त्याच्या पाच साथीदारांनी धावत्या बसमध्ये २३ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केला. सहा नराधमांनी तिला आणि तिच्या मित्राला लोखंडी सळ्यांनी मारहाण करीत बसमधून फेकून दिले.
  • १७ डिसेंबर २०१२ पासून संबंधित मुलीवर दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचार. संबंधित मुलगी या घृणास्पद कृत्यामध्ये गंभीर जखमी झाली. या घटनेमुळे राजधानी नवी दिल्लीत उग्र निदर्शनांना सुरुवात
  • १८ डिसेंबर २०१२ बलात्कार प्रकरणानंतर दोन दिवसांत दिल्ली पोलिसांनी सहा नराधमांना अटक केली. मुख्य आरोपी राम सिंह याच्यासह त्याचा भाऊ मुकेश सिंह याला राजस्थानमधून अटक करण्यात आली. आरोपी विनय शर्मा आणि पवन गुप्ता यांना दिल्लीतून अटक करण्यात आली. अल्पवयीन आरोपीला दिल्लीतून तर अन्य आरोपी अक्षय ठाकूर याला औरंगाबादमधून ताब्यात घेण्यात आले.
  • १९ डिसेंबर २०१२ रुग्णालयात दाखल करण्यात आल्यापासून पीडितेवर पाच शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
  • २१ डिसेंबर २०१२ रोजी पीडितेने उपविभागीय न्यायदंडाधिकाऱय़ांपुढे जबाब नोंदविला.
  • २६ डिसेंबर २०१२ पीडितेला सिंगापूरमधील माऊंट एलिझाबेथ रुग्णालयात हलविण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला
  • २७ डिसेंबर २०१२ हवाई रुग्णवाहिकेतून पीडितेला सिंगापूरला नेत असतानाच तिला ह्रदयविकाराचा झटका आला आणि तिची प्रकृती आणखी खालावली
  • २९ डिसेंबर २०१२ पीडितेचा सिंगापूरमधील रुग्णालयात मृत्यू. देशभरात उग्र निदर्शनांना सुरुवात
  • ३ जानेवारी २०१३ पाच प्रौढ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले. बलात्कार, खून, अपहरण, पुरावे नष्ट करणे, पीडितेच्या मित्रावर जीवघेणा हल्ला आदी आरोप आरोपींवर ठेवण्यात आले.
  • ११ मार्च २०१३ मुख्य आरोपी राम सिंह यांची तिहार तुरुंगात आत्महत्या
  • ३१ ऑगस्ट २०१३ घटनेतील अल्पवयीन आरोपी दोषी असल्याचा निकाल. तीन वर्षे सुधारगृहात ठेवण्याची शिक्षा