News Flash

दिल्ली सामूहिक बलात्कारप्रकरणी पोलीस महिलेची साक्ष

उभ्या देशाला हादरवून सोडणाऱ्या दिल्ली सामूहिक बलात्कारप्रकरणी ‘आपणच पाच आरोपींना अटक केली होती आणि त्यांच्याकडेच महत्त्वाचे पुरावे सापडले’ अशी साक्ष पोलीस महिलेने दिली. या प्रकरणी

| June 2, 2013 12:29 pm

उभ्या देशाला हादरवून सोडणाऱ्या दिल्ली सामूहिक बलात्कारप्रकरणी ‘आपणच पाच आरोपींना अटक केली होती आणि त्यांच्याकडेच महत्त्वाचे पुरावे सापडले’ अशी साक्ष पोलीस महिलेने दिली. या प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश योगेश खन्ना यांच्यासमोर सुरू असलेल्या खटल्यात वसंत विहार पोलीस स्थानकातील पोलीस उपनिरीक्षक महिलेची साक्ष सलग दुसऱ्या दिवशी नोंदविण्यात आली.
मृत युवतीच्या चोरीस गेलेल्या वस्तू तसेच रक्ताचे डाग असलेले वस्त्रांचे नमुने अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींकडूनच आपल्याला मिळाले, अशी माहिती सदर पोलीस महिलेने न्यायालयात दिली. आरोपींनी पीडित युवती आणि तिचा मित्र अशा दोघांच्या काही मौल्यवान वस्तू लपविण्याचा प्रयत्न केला होता, मात्र या अटकेवेळी त्या जप्त करण्यात आल्या असल्याची माहितीही सदर पोलीस महिलेने दिली.
आरोपींची ओळखपरेड झाली का, असा प्रश्न विचारला असता २८ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंत्याने सर्व आरोपींना अचूक ओळखले असे पोलीस उपनिरीक्षक महिलेने स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2013 12:29 pm

Web Title: delhi gangrape evidence recovered at dec 16 accused instance investigating officer tells court
Next Stories
1 रशियात धूम्रपान बंदीचा पहिला टप्पा सुरू
2 पाकिस्तानचे शिष्टमंडळ पर्यवेक्षणासाठी भारतात
3 घराणेशाहीच्या राजकारणावर चर्चा घडवून आणणार
Just Now!
X