23 November 2017

News Flash

‘त्या’ अल्पवयीन आरोपीवर हत्या, बलात्काराचा आरोप निश्चित

गेल्या डिसेंबरमध्ये दिल्लीतील एका युवतीवर धावत्या बसमध्ये सामुहिक बलात्कार करणाऱयापैकी एका अल्पवयीन आरोपीवर जुवेनाईल

नवी दिल्ली | Updated: February 28, 2013 7:24 AM

गेल्या डिसेंबरमध्ये दिल्लीतील एका युवतीवर धावत्या बसमध्ये सामुहिक बलात्कार करणाऱयापैकी एका अल्पवयीन आरोपीवर जुवेनाईल जस्टिस बोर्डाने हत्येचा आणि बलात्काराचा आरोप निश्चित केला.
२३ वर्षीय युवतीवर बसमध्ये सामुहिक बलात्कार करून नंतर तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आले होते. त्यामध्ये संबंधित युवती गंभीर जखमी झाली होती. उपचारांसाठी तिला सिंगापूरला हलविण्यात आले होते. तिथे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.
प्राथमिक तपासात मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे या घटनेतील १७ वर्षीय आरोपीवर बलात्कार आणि हत्येचा आरोप निश्चित करण्याचा निर्णय न्या. गीतांजली गोएल यांनी दिला. भारतीय दंडविधान संहितेच्या विविध कलमांखाली संबंधित आरोपीवर अपहरण, सामुहिक बलात्कार, हत्या, शारीरिक अत्याचार, दरोडा, पुरावे नष्ट करणे, कट रचणे आदी आरोप निश्चित करण्यात आले आहेत. सहा मार्चपासून याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.

First Published on February 28, 2013 7:24 am

Web Title: delhi gangrape juvenile court frames rape murder charges against minor