21 September 2020

News Flash

निर्भया बलात्कार प्रकरण: ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं होतं?

निर्भयासाठी 'ती' रात्र काळरात्र ठरली

संग्रहित छायाचित्र

१६ डिसेंबर २०१२. रविवारचा दिवस होता. हिवाळा असल्याने गारवा वाढला होता. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक कमी होती. २३ वर्षांची निर्भया संध्याकाळी साकेतमधील सिलेक्ट सिटी मॉलमधून ‘लाईफ ऑफ पाय’ हा चित्रपट पाहून मित्रासोबत मुनीरका परिसरातील बस थांब्यावर घरी जाण्यासाठी बसची वाट पाहत थांबली होती. बसची वाट पाहता-पाहता अर्धा तास निघून गेला.

निर्भयाला घरी जाण्याची घाई होती. ९-९.१५ च्या सुमारास त्यांच्यासमोर एक पांढऱ्या रंगाची बस थांबली. बसमधील एका व्यक्तीने निर्भया आणि तिच्या मित्राला बसमध्ये चढण्यास सांगितले. दोघेही थोडे बिचकत बिचकत बसमध्ये चढले. त्या बसमध्ये चालकासह सहा लोक होते. निर्भया आणि तिचा मित्र बसमध्ये चढताच एकाने बसचा दरवाजा बंद केला. यानंतर बसमधील तरुणांनी निर्भयाची छेड काढण्यास सुरुवात केली. निर्भयाच्या मित्राने त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न करताच तरुणांनी त्याला रॉडने जबर मारहाण केली.

निर्भयाचा मित्र मारहाणीत गंभीर जखमी झाला. यानंतर बसमधील तरुणांनी निर्भयावर सामूहिक बलात्कार केला. या दरम्यान बस सुरुच होती आणि साधारणत: २० किलोमीटर दूर गेली होती. दोषींनी बलात्कारानंतर निर्भयाला विवस्त्र अवस्थेत रस्त्यावर फेकून दिले. यानंतर या ठिकाणीवरुन जात असलेल्या काहींनी याबद्दलची माहिती पोलिसांना दिली.

रात्री १० वाजून २२ मिनिटांनी दिल्लीतील पोलीस ठाण्याला महिपालपूरहून दिल्ली कँट जात असताना जीएमआर कंपनीच्या गेट क्रमांक एकच्या समोर एक तरुण आणि तरुणी बेशुद्ध अवस्थेत सापडले. यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी दोघांना सफदरजंग रुग्णालयात नेले. घटनेच्या काही दिवसानंतर निर्भयाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बलात्कार करणाऱ्या तरुणांनी निर्भयाला जबर मारहाण केल्याने तिच्या शरीराच्या आतील भागात दुखापत झाली होती. दुखापतींवर उपचार सुरु असतानाच निर्भयाची प्राणज्योत मालवली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2017 3:36 pm

Web Title: delhi gangrape what happened on 16 december 2012
Next Stories
1 Nirbhaya Case: समाजाला संदेश देण्यासाठी तुम्ही कोणाला फाशी देऊ शकत नाही; आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद
2 टॅल्कम पावडरने कॅन्सर झाल्याचा दावा, ‘जॉन्सन अॅण्ड जॉन्सन’ला ११ कोटीचा दंड
3 आता पतंजली देणार केएफसी, मॅकडॉनल्ड्सला टक्कर
Just Now!
X