दिल्ली सरकारने जनलोकपाल विधेयक बुधवारी मंजूर केले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाच्या वेळी जे विधेयक प्रस्तावित करण्यात आले होते त्याच्याशी साधम्र्य असलेले हे विधेयक असून लवकरच ते विधानसभेत मांडण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली. या विधेयकात अन्य तरतुदींसह मुख्यमंत्र्यांचे कार्यालय विधेयकाच्या कार्यकक्षेत आणण्याची तरतूद आहे.