News Flash

गुरगाव-दिल्ली द्रुतगती महामार्गावरील वाहतूक सुरळीत

दिल्ली उच्च न्यायालयाने गुरगाव-दिल्ली द्रुतगती महामार्गावरील टोल रद्द करण्याचा आदेश दिल्यानंतर या मार्गावरून विनाविलंब प्रवास करण्याचे सुख चालकांना गुरुवारपासून अनुभवता आले.

| February 21, 2014 03:06 am

दिल्ली उच्च न्यायालयाने गुरगाव-दिल्ली द्रुतगती महामार्गावरील टोल रद्द करण्याचा आदेश दिल्यानंतर या मार्गावरून विनाविलंब प्रवास करण्याचे सुख चालकांना गुरुवारपासून अनुभवता आले. न्यायालयाच्या आदेशामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या लक्षावधी प्रवाशांनाही दिलासा मिळाला आहे.
गुरगाव-दिल्ली मार्गावर टोलवसुलीची १६ केंद्रे असून त्यापैकी १२ केंद्रे १९ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासनू बंद करण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. या संदर्भात, ‘नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया’, ‘दिल्ली-गुरगाव सुपर कनेक्टिव्हिटी लिमिटेड’ आणि ‘इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेण्ट फायनान्स कॉर्पोरेशन’ यांच्यात झालेल्या त्रिपक्षीय कराराची नोंद करून न्यायालयाने उपरोक्त आदेश दिला.
या महामार्गावर टोलवसुलीसाठी लागत असलेल्या वाहनांच्या मोठय़ा रांगांमुळे तेथून वाढत्या संख्येने जाणारे प्रवासी कमालीचे नाराज झाले होते, असे ‘टोल हटाओ संघर्ष समिती’चे निमंत्रक अत्तार सिंग संधू यांनी सांगितले. सदर टोलनाका २००८ मध्ये सुरू झाल्यापासून या मार्गावरील प्रवास सुरळीत पार पडावा, अशी अपेक्षा टोल भरणाऱ्या चालकांची होती. परंतु त्यांना तसा सुखद अनुभव कधीही आला नव्हता, असे संधू म्हणाले.
हा टोल हटविण्याच्या मागणीसाठी स्थानिक नागरिक तसेच विविध संघटनांनी हरयाणाचे मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड, वाहतूक मंत्रालय आणि राष्ट्रीय महामार्ग नियामक मंडळास अनेकदा निवेदने दिली होती. परंतु त्याचा काही फायदा झाला नव्हता, असे त्यांनी सांगितले. या मुद्दय़ाचे निराकरण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय, पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयातही धाव घेण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2014 3:06 am

Web Title: delhi gurgaon expressway made toll free following delhi high courts order
Next Stories
1 हा आत्म्यावरील हल्ला – पंतप्रधान
2 आता गुगलवरून ‘रायगड’ दर्शन
3 पत्नीला दरमहा ४० हजार रुपये द्या!
Just Now!
X