दिल्ली पोलिसांना त्या व्यक्तीच्या कुटुंबाीयांना ७५ लाख रूपयांची भरपाई करण्याचा आदेश दिल्ली हायकोर्टाने बुधवारी दिला आहे. २०१५ मध्ये दिल्ली पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेडमुळे झालेल्या भीषण अपघात एक तरूण कोमामध्ये गेला होता. याप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू होती. बुधवारी कोर्टाने दोन्ही बाजूचे म्हणणं एकूण घेतलं. त्यानंतर पोलिसांना नुकसान भरपाई म्हणून अपघातग्रस्त मुलाच्या कुटुंबीयांना ७५ लाक रूपये देण्याचा आदेश दिला. पोलिसांनी रस्त्यावर लावलेले बॅरिकेड साखळीने बांधले होते शिवाय तिथे कोणत्याही प्रकारचे रिफ्लेक्टर किंवा सुचना फलक दिसत नव्हते त्यामुळे हा अपघात झाल्याचा निष्कर्ष कोर्टानं काढला.

दिल्ली हायकोर्टाचे न्यायमूर्ती नवीन चावला यांनी दिल्ली पोलिसांना ७५ लाखांची रक्कम देण्याचा आदेश दिला. ते म्हणाले की, या प्रकरणामध्ये दिल्ली पोलिसांचा निष्काळजीपणा दिसून येतोय. दिल्ली पोलिसांनी रस्त्यावर लावलेल्या बॅरिकेडवर कोणतीही लाईट आणि रिफ्लेक्टर नव्हते. त्यामुळे दुचाकीवर असलेल्या तरूणाला बॅरिकेड दिसले नाहीत. शिवाय वाहानांचा प्रवेश बंद करण्यासाठी लावलेल्या बॅरीकेडला साखळीने बांधण्यात आले होते. परिणामी तरूणाला आंधारामध्ये बॅरिकेड दिसून आले नाहीत.

दिल्ली पोलिसांनी आपली बाजू मांडताना म्हटले की, बॅरिकेड योग्य जागी होते आणि स्पष्ट दिसून येत होते. पण, दुचाकीस्वार वेगाने आला अन् त्याला योग्यवेळी ब्रेक न लागल्यामुळे अपघात झाला. पोलिस म्हणाले की, अपघातावेळी दुचाकीस्वार धीरज कुमार आणि त्याच्या वडिलांनी हेल्मेटही घातले नव्हते. धीरज कुमार यांच्या वकिलांनी सांगितले की, अपघातावेळी धीरजकुमारने हेल्मेट घातले होते. तसेच पोलिस आपला निष्काळजीपणा लपवत आहे.

डिसेंबर २०१५ मध्ये दिल्लीतील पंजाबी बागेच्या परिसरात हा अपघात झाला होता. अपघातावेळी धीरजचं वय २१ वर्ष होते. अपघावेळी त्याचे वडिलाही सोबत होते. अपघात झाल्यानंतर तरूणाला तात्काळ सफदरजंग रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून तो कोमामध्ये आहे. मुलाच्या या अवस्थेनंतर कुटुंबीयांनी गायकोर्टात धाव घेतली होती.