महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याविरोधातील अजामीनपात्र वॉरंटच्या अमलबजावणीला दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली.
२००८मध्ये बिहारी नागरिकांच्याविरोधात प्रक्षोभक वक्तव्य केल्याबद्दल राज ठाकरे यांच्यावर अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. त्याला स्थगिती मिळाल्यामुळे राज ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे. न्या. सुनील गौर यांनी ही स्थगिती दिली.
न्यायालयाने याचिका दाखल करणारे सुधीरकुमार ओझा यांना नोटीस पाठविली असून, या प्रकरणात त्यांची बाजू मांडण्याची सूचना केली आहे. पुढील सुनावणी १६ एप्रिलला होणार आहे.