News Flash

कोव्हॅक्सिनची लहान मुलांवर क्लिनिकल ट्रायल; कोर्टाची केंद्र सरकार आणि भारत बायोटेकला नोटीस

करोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका

सौजन्य- एएनआय

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आतापासून तयारी सुरु करण्यात आली आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना होणारा धोका पाहता लसीकरणावर जोर देण्यात येणार आहे. त्यासाठी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला २ ते १८ वर्षांमधील मुलांवर क्लिनिकल ट्रायल करण्याची परवानगी १२ मे रोजी देण्यात आली आहे. मात्र या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने केंद्र सरकार आणि भारत बायोटेकला नोटीस पाठवली आहे.

मुख्य न्यायाधीश डीएन पटेल आणि न्यायमूर्ती ज्योति सिंह यांनी केंद्र आणि भारत बायोटेकला नोटीस जारी केली आहे. १५ जुलैपर्यंत आपलं मत मांडण्यास सांगितलं आहे.

दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, पाटण्यातील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूरची ‘मेडीट्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ या संस्थांमध्ये ५२५ मुलांवर या चाचण्या करण्यात येणार आहेत. केंद्रीय औषध प्रमाणन नियंत्रण संस्थेच्या तज्ज्ञ समितीने भारत बायोटेकच्या लसीच्या चाचण्या मुलांवर करण्याबाबत चर्चा केली होती. त्यानंतर या क्लिनिकल ट्रायलला परवानगी देण्यात आली आहे.

कुणीच वाचलं नसतं! अरबी समुद्रात मृत्यूला स्पर्शून आलेल्यांच्या अश्रूंचा फुटला बांध

देशात मागील २४ तासांत २ लाख ६७ हजार ३३४ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. दिलासा देणारी बाब म्हणजे याच कालावधीत देशात ३ लाख ८९ हजार ८५१ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. असं असलं तरी वाढत्या मृत्यूमुळे देशाची चिंता वाढली आहे. गेल्या २४ तासांत आतापर्यंतची उच्चांकी मृत्यूंची नोंद झाली आहे. देशात मंगळवारी ४ हजार ५२९ रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांचा आकडा २ लाख ८३ हजार २४८ वर जाऊन पोहोचला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 1:08 pm

Web Title: delhi high court issues notice to centre clinical trials of covaxin for children rmt 84
टॅग : Corona
Next Stories
1 आज नाही तर २१ मे ला लागणार तरुण तेजपाल प्रकऱणाचा निकाल…याविषयी सविस्तरपणे जाणून घ्या!
2 कुणीच वाचलं नसतं! अरबी समुद्रात मृत्यूला स्पर्शून आलेल्यांच्या अश्रूंचा फुटला बांध
3 अमृतसरमध्ये फायनान्स कर्मचाऱ्याचे हात कापून १५०० रुपये लुटले
Just Now!
X