News Flash

प्रसारमाध्यमांना वाटेल तशी टीका करण्याचा अधिकार नाही

दिल्लीतील न्यायालयाचा निकाल

दिल्लीतील न्यायालयाचा निकाल

प्रसारमाध्यमांना सरसकट कोणावरही टीका करण्याचा आणि त्या व्यक्तीची मानहानी करण्याचा अधिकार नाही, असा निकाल दिल्लीतील न्यायालयाने दिला आहे.

पत्रकारांना अन्य नागरिकांपेक्षा अधिक स्वातंत्र्य नाही. तसेच पत्रकारांकडे माहितीच्या प्रसाराची ताकद असल्याने त्यांच्यावर अधिक जबाबदारी आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. येथील एका व्यक्तीबद्दल बदनामीकारक मजकूर छाफल्याप्रकरणीच्या खटल्यात न्यायालयाने हा निकाल दिला. या खटल्यातील आरोपी असलेल्या नियतकालिकाच्या व्यवस्थापकीय संपादकाने व अन्य व्यक्तीने पीडित व्यक्तीला अनुक्रमे ३०,००० व २०,००० रुपये द्यावेत, असा आदेशही न्यायालयाने दिला.

पत्रकारांना समाजात अन्य नागरिकांपेक्षा वेगळे स्थान नाही. त्यांना राज्यघटनेनुकार काही वेगळे किंवा विशेष अधिकार नाहीत. सर्वनागरिकांना जसे घटनेच्या कलम १९ आणि २१ अनुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, अवैधरीत्या जीव घेण्यापासून संरक्षणचा अधिकार आहे, तसाच आणि तितकाच तो पत्रकारांना आहे. याशियावाय पत्रकारांना कोणतेही विशेषाधिकार नाहीत, असे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश राज कपूर यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2017 12:41 am

Web Title: delhi high court on media reporting
Next Stories
1 ‘५०-६० कोटींमध्ये बिहारचा विकास होणार नाही, केंद्रानं सढळ हातानं मदत करावी’
2 स्वित्झर्लंडशी करार; काळा पैसा भारतात येण्याचा मार्ग सुकर?
3 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘नमो’ नावाची व्याख्याच काँग्रेसनं बदलली
Just Now!
X