22 September 2020

News Flash

दिल्लीत हिज्बुल मुजाहिद्दीनच्या हस्तकाला अटक

संशयित हस्तक जम्मू-काश्मीरमधील पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येमध्ये सामील होता, असे सांगितले जाते.

प्रतिकात्मक छायाचित्र

दिल्लीत सुरक्षा दलांनी हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित एका तरुणाला अटक केली आहे. तो दहशतवादी संघटनेचा हस्तक असून सुरक्षा दलांनी त्याला दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. संशयित हस्तक जम्मू-काश्मीरमधील पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येमध्ये सामील होता, असे सांगितले जाते.

जम्मू- काश्मीर पोलीस दलाचे उपनिरीक्षक इम्तियाज अहमद मीर यांची ऑक्टोबरमध्ये दहशतवाद्यांनी हत्या केली होती. मीर हे जम्मू-काश्मीर पोलीस दलात सीआयडी विभागात कार्यरत होते. अनेक दिवसांपासून ते आपल्या आई-वडिलांची भेट घेऊ शकले नव्हते. शेवटी पेहराव बदलून ते घरी येत होते. त्यांनी दाढी काढली होती. मात्र, तरी देखील दहशतवाद्यांनी त्यांना गाठले आणि त्यांची हत्या केली होती.

इम्तियाज मीर यांच्या हत्येप्रकरणी सुरक्षा दलांनी दिल्लीतील हिज्बुल मुजाहिद्दीनच्या हस्तकाला अटक केली आहे. इम्तियाज मीर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात यश आल्याने सुरक्षा दलांना मोठे यश मिळाल्याचे सांगितले जाते. सुरक्षा दलांनी संबंधित हस्तकाला दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेच्या ताब्यात दिले आहे. या कारवाईबाबत दिल्ली पोलिसांकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2018 4:29 pm

Web Title: delhi hizbul mujahideen operative arrested from delhi involved in murder of kashmir cop imtiyaz mir
Next Stories
1 राम मंदिर निर्मितीसाठी खुशाल अध्यादेश काढा-पक्षकार इक्बाल अन्सारी
2 अमृतसर ग्रेनेड हल्ला : भटिंडातून दोन तरुणांना अटक
3 अरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पूड फेकली, तरुण ताब्यात
Just Now!
X