News Flash

…म्हणून IIT इंजिनिअरने रचला स्वतःच्या अपहरणाचा कट, आत्महत्येचा होता विचार

संध्याकाळी सहाच्या सुमारास घरातून एटीएममध्ये जाण्यासाठी निघाला...

(प्रतिकात्मक छायाचित्र)

दिल्लीच्या रोहिणी परिसरात राहणाऱ्या एका तरुणाच्या वडिलांच्या मोबाइलवर मेसेज आला, ‘मुलाला जिवंत बघायचं असेल तर उद्यापर्यंत पाच लाख रुपयांची व्यवस्था करा’.  मुलगा घरी नव्हता, त्यामुळे आपल्या इंजिनिअर मुलाच्या बाबतीत आलेला अशाप्रकारचा मेसेज वाचून वडिलांना धक्का बसला. त्यांनी तातडीने मुलाच्या अपहरणाबाबत पीसीआरला माहिती दिली. पीसीआरद्वारे स्थानिक पोलिसांना आयआयटी इंजिनिअर विद्यार्थ्याचं अपहरण झाल्याची माहिती मिळताच तेही सतर्क झाले.

मुलगा रविवारी(दि.19) संध्याकाळी सहा वाजता घरातून एटीएममध्ये जाण्यासाठी निघाला होता आणि आठ वाजेपासून त्याचा मोबाइल स्विच ऑफ आहे, अशी माहिती वडिलांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीद्वारे तपास सुरू केला. त्यात तो इंजिनिअर मुलगा पायी जात असताना दिसला. पण एटीएमकडे न जाता तो मुख्य रस्त्याच्या दिशेने जाताना सीसीटीव्हीत दिसलं. त्यानंतर पोलिसांनी त्याचा मोबाइल ट्रेस केल्यावर सराई रोहिल्ला रेल्वे स्टेशन येथे त्याचं शेवटचं लोकेशन असल्याचं कळलं. सीसीटीव्हीमध्ये तो मुलगा जयपूर जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढताना दिसला. नंतर पोलिसांनी जयपूर जीआरपीसोबत संपर्क साधला आणि त्या तरुणाच्या कुटुंबियांसोबत जयपूरला जाऊन त्याला पुन्हा दिल्लीला आणलं.

पुन्हा दिल्लीला आणल्यावर पोलिसांनी त्याची चौकशी केली. त्यावेळी, “दिल्ली आयआयटीमधून इंजिनिअरींग केल्यानंतर आयआयएम, अहमदाबादमधून एमबीए करायचं होतं. त्यासाठी दोन वेळेस प्रयत्न केला पण दोन्ही वेळेस अपयशी ठरल्यामुळे मानसिक तणावात गेलो होतो, त्यातून आत्महत्येचा प्लॅन केला” अशी माहिती त्याने दिली. तर, “तरुणाने ट्रेनमधून उडी मारण्याचाही विचार केला होता पण घरच्यांना त्रास होईल म्हणून त्याने ते पाऊल उचललं नाही, अखेर त्याने अपहरणाचा खोटा मेसेज वडिलांना पाठवला”, अशी माहिती पोलिस उपायुक्त (रोहिणी) पी.की.मिश्रा यांनी दिली. दरम्यान, समुपदेशनानंतर त्याला सोडण्यात आल्याचंही पोलिसांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2020 11:43 am

Web Title: delhi iit engineer faked kidnapping to end life sas 89
Next Stories
1 “वचन होतं राम राज्याचं, दिलं गुंडाराज”; योगी सरकारवर राहुल गांधींची टीका
2 Coronavirus: भारतात आतापर्यंत तब्बल १ कोटी ४७ लाख चाचण्या, रुग्णसंख्या १२ लाखांजवळ
3 राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी आणणार संगमावरून माती
Just Now!
X