भाजपातील प्रभावशाली नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनामुळे राजधानी दिल्लीने एका वर्षात तीन मुख्यमंत्री गमावले आहेत. यापूर्वी शीला दीक्षित आणि मदन लाल खुराणा या दोन माजी मुख्यमंत्र्यांचे देहावसान झाले आहे.

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी केंद्रातील सत्तेबरोबर दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदीही काम केले होते. १९९८ मध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत सुषमा स्वराज दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी होत्या. सुषमा स्वराज यांच्याबरोबरच तीन वेळा दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे सांभाळणाऱ्या शीला दीक्षित यांचेही चालु वर्षातील जुलै महिन्यात निधन झाले. शीला दीक्षित यांचे निधनही कॉर्डियाक अॅटॅकनेच झाले होते. १९९३ ते १९९६ या काळात दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी असलेल्या मदन लाल खुराणा यांचेही याच वर्षी निधन झाले आहे.