27 November 2020

News Flash

दिल्लीत भरगर्दीत धावत्या बसमध्ये तरुणीसमोरच केले हस्तमैथून

या विकृत तरुणाला शिकवा धडा

प्रतिकात्मक छायाचित्र

दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भरगर्दीत धावत्या बसमध्ये एका विकृत तरुणाने दिल्ली विद्यापीठातील तरुणीसमोर हस्तमैथून केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. तरुणीने धाडस दाखवत हा प्रकार कॅमेऱ्यात कैद केला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केल्याने हा प्रकार उघड झाला.

दिल्ली विद्यापीठात शिकणारी तरुणी ७ फेब्रुवारी रोजी बसने वसंत व्हिलेजमधून आयआयटी गेट येथे जात होती. ‘सकाळी बसमध्ये गर्दी होती. माझ्या बाजूला बसलेला तरुण हस्तमैथून करत होता. हा प्रकार बघून मला धक्काच बसला. मुलीसमोर हस्तमैथून करणे हा गुन्हाच आहे हे देखील त्याला कळत नव्हते. त्याला धडा शिकवण्यासाठी मी या घटनेचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर अपलोड केला, असे त्या तरुणीने ‘एएनआय’शी बोलताना सांगितले. मी त्या तरुणाला जाबही विचारला. मात्र त्याने माझ्याकडे दुर्लक्ष केले, असे तिने म्हटले आहे.

तरुणीने वसंत विहार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी भारतीय दंड विधानातील कलम ३५४ (विनयभंग), २९४ (सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करणे) या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला आहे.

काही महिन्यांपूर्वी दिल्लीप्रमाणेच मुंबईतील लोकल ट्रेनमध्येही अशा घटना घडल्या होत्या. त्यामुळे अशा घटना थांबणार कधी?, विकृत वृत्तींवर कायद्याचा धाक कधी निर्माण होणार, असा प्रश्न महिलांकडून उपस्थित होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2018 12:54 pm

Web Title: delhi man masturbates in front of du student in moving bus brave girl uploads video on social media fir registered
टॅग Bus
Next Stories
1 …म्हणून उमा भारती निवडणूक लढवणार नाही
2 कम्युनिस्ट सरकारच्या अनागोंदी कारभारामुळे त्रिपुराचा विकास खुंटला – अमित शाह
3 Video : रशियातील विमानाला भीषण अपघात, अंगावर काटा आणणारी दृश्ये व्हायरल
Just Now!
X