News Flash

फूड डिलिव्हरी बॉयसाठी दरवाजा उघडणाऱ्या प्रॉपर्टी डिलरची गोळ्या झाडून हत्या

पोलिसांनी याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजही तपासले आहे

अमित कोचर या प्रॉपर्टी डिलरने ऑनलाईन जेवण मागवले. दरवाजावर बेल वाजली तेव्हा त्याला असे वाटले की डिलिव्हरी बॉय आला आहे. मात्र त्याने दरवाजा उघडला तेव्हा त्याला काही गुंडांनी त्याला घराबाहेर खेचले आणि कारमध्ये नेऊन त्याच्यावर गोळ्या झाडल्या. दिल्लीतल्या विकासपुरी भागात ही घटना घडली.

अमित कोचर याच्या घरी त्याचे दोन मित्र गुरूवारी रात्री आले होते. त्याची पत्नी कामावर गेली होती. कोचर आणि त्याच्या मित्रांनी ऑनलाईन अन्न मागवले. काही वेळाने फ्लॅटची बेल वाजली. फूड डिलिव्हरी बॉय आला असे वाटून अमित कोचर याने दरवाजा उघडला. तेव्हा काही लोकांनी त्याला बाहेर खेचले आणि कारजवळ घेऊन गेले. कारमध्ये अमित कोचरला ढकलले आणि त्याच्यावर गोळ्या झाडल्या. अमितवर गोळ्या झाडण्यात आल्या तेव्हा त्याचे मित्र त्याच्या घरात होते असे एएनआयने दिलेल्या बातमीवरून समजते आहे.

जेव्हा अमित कोचर आला नाही आणि गोळीबाराचा आवाज त्याच्या मित्रांनी ऐकला तेव्हा त्यांनी बाहेर जाऊन पाहिले. जिथे त्यांना कळले की अमित कोचरवर गोळीबार झाला आहे. त्यांनी तातडीने त्याला डीडीयू रूग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. अमित कोचरच्या मित्रांची चौकशी केली जाते आहे. सीसीटीव्ही फुटेजही तपसाले जाते आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2019 7:00 pm

Web Title: delhi man opens door for food delivery boy shot dead outside house scj 81
Next Stories
1 टीव्ही मालिकांच्या सुरुवातीला आणि शेवटी स्थानिक भाषा वापरा, केंद्र सरकारची सक्ती
2 वायू चक्रीवादळामुळे आणखी सात रेल्वे रद्द
3 बिहार सरकारची वृद्धांसाठी नवी पेन्शन योजना
Just Now!
X