22 January 2021

News Flash

दिल्लीत पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार, पाच जणांना अटक

मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि इतर सामग्री जप्त

संग्रहित

राजधानी दिल्लीत पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने कारवाई करत पाचही दहशतवाद्यांना अटक केली आहे. दिल्लीमधील शकरपूर परिसरात झालेल्या चकमकीनंतर अटकेची कारवाई करण्यात आली. पोलिसांनी यावेळी मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि इतर सामग्री जप्त केली आहे.

विशेष पथकाचे डीसीपी प्रमोद कुशवाहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, “दिल्लीमधील शकरपूर परिसरात झालेल्या गोळीबारानंतर पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यामधील दोघेजण पंजाब तर तिघे जण काश्मीरचे आहेत. शस्त्र तसंच इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे”.

या सर्व दहशतवाद्यांना आयएसआयचा पाठिंबा होती अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. दरम्यान ते कोणत्या दहशतवादी संघटनेसी संबंधित आहेत याची माहिती अद्याप मिळालेली नसल्याचंही दिल्ली पोलिसांनी सांगितलं आहे.

अटक करण्यात आलेल्यांपैकी एकाचा शौर्यचक्र विजेता बलविंदर सिंग यांच्या हत्येत सहभाग असल्याची शक्यता आहे. हत्येमध्ये त्याची नेमकी काय भूमिका होता याचा तपास केला जात असल्याचं दिल्ली पोलिसांनी सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2020 10:15 am

Web Title: delhi police arrest fiver terrorist after firing in shikarpur sgy 87
Next Stories
1 शेतकरी आंदोलनावर भाजपा खासदार सनी देओल यांनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
2 लंडन : शेतकरी समर्थनार्थ आंदोलनात दिसला भारतविरोधी अजेंडा; फडकले खलिस्तानी झेंडे
3 दिलजीतच्या ‘त्या’ ट्विटवर प्रियांका चोप्रा झाली व्यक्त, ट्विट करत म्हणाली…
Just Now!
X