देशाच्या राजधानी दिल्लीत मंगळवार रात्रीपासून पोलिसांनी केलेल्या धाडसत्रात १२ संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. हे संशयित दहशतवादी ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. दिल्ली आणि जवळपासच्या राज्यातून छापा टाकून दिल्ली पोलिसांनी या १२ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या पूर्व भागात गोकुलपुरी परिसरात स्फोटके तयार करणाऱया दोन तरुणांना सुरूवातीला ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर काही तासांत या दोघांच्या मदतीने आणखी दहा जणांना पुढील काही तासांत अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेले सर्वजण दहशतवादी संघटनेच्या स्लिपर युनिटमधील असून, राजधानी दिल्लीत घातपात घडवून आणण्याचा त्यांचा उद्देश होता.