News Flash

#MeToo: एम. जे. अकबर यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस आक्रमक; घराबाहेर कार्यकर्त्यांची निदर्शने

अकबर यांनी काल परदेश दौऱ्यावरुन परतल्यानंतर आपल्यावरील लैंगिक गैरवर्तनाचे आरोप फेटाळून लावले. तसेच आपल्यावर लावण्यात आलेले बिनबुडाचे असल्याचे सांगत राज्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांच्या घराबाहेर युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करीत अकबर यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी केली.

लैंगिक गैरवर्तनाचा आरोप असलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी तातडीने आपल्या केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी अकबर यांच्या दिल्लीतील निवासस्थानी निदर्शने केली. दरम्यान, पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.


अकबर यांनी आपल्या परराष्ट्र राज्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करणाऱ्या घोषणा सोमवारी अकबर यांच्याघराबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या. अकबर यांनी काल परदेश दौऱ्यावरुन परतल्यानंतर आपल्यावरील लैंगिक गैरवर्तनाचे आरोप फेटाळून लावले. तसेच आपल्यावर लावण्यात आलेले बिनबुडाचे असल्याचे सांगत राज्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्याच्या या स्पष्टीकरणानंतर काँग्रेसने हा पवित्रा घेतला.

एम. जे. अकबर हे पत्रकार असून त्यांच्या पत्रकारितेतल्या काळात त्यांनी अनेक पत्रकार महिलांशी गैरवर्तन केल्याचा दावा काही महिलांनी मीटू मोहिमेंर्गत केला आहे. मात्र, अकबर यांच्यावर आरोप करण्यात आले त्यावेळी ते सरकारच्यावतीने परदेश दौऱ्यावर असल्याने त्यांनी यावर भाष्य करणे टाळले होते. मात्र, रविवारी ते भारतात परतले. त्यानंतर त्यांना विमानतळावरच माध्यमांच्या प्रतिनिधींनी घेरले. मात्र, आपण यावर लवकरच स्पष्टीकरण देऊ असे त्यांनी सांगितले. त्यानंतर काही तासातंच त्यांनी आपल्यावरील आरोपांवर प्रतिक्रिया दिली. आल्यावरील सर्व आरोप फेटाळत या प्रकारामुळे आपली प्रतिमा मलिन झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच आरोप करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, अकबर यांच्यावरील आरोपांवरुन भाजपामध्ये दोन गट पडले होते. एका गटाकडून अकबर यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात यावी असे सांगण्यात येत होते. तर दुसऱ्या गटाकडून अकबर यांच्याकडून केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी केली जात होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2018 1:40 pm

Web Title: delhi police detained members of youth congress who were protesting outside the residence of m j akbar demanding his resignation
Next Stories
1 गोव्यात महिलेची बलात्कार करुन हत्या, २३ वर्षीय तरुणाला अटक
2 न्यायाधीशाच्या कुटुंबावर गोळीबार, पोलिसांचा तपास मात्र अधांतरी
3 मुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”
Just Now!
X