पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत २०१६ मध्ये केलेल्या अक्षेपार्ह वक्तव्यामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश द्यावेत यासाठी दाखल झालेल्या तक्रारीवर दिल्ली पोलिसांनी रोस एवेन्यू कोर्टात अॅक्शन टेकन रिपोर्ट दाखल केला आहे. याप्रकरणार २२ मे रोजी सुनावणी होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात वकील जोगिंदर तुली यांनी तक्रार दाखल केली होती. पंतप्रधानांविरोधात आपत्तीजनक वक्तव्य केल्यामुळे राहुल गांधी यांच्या विरोधात u/s 124A अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘शहीदांच्या रक्ताची दलाली’ करत आहेत, असा आरोप २०१६ मध्ये राहुल गांधी यांनी केला होता.