News Flash

…आणि दिल्ली पोलिसांनी रुग्णवाहिका केली जप्त

रुग्णवाहिका चालकाला अटक

…आणि दिल्ली पोलिसांनी रुग्णवाहिका केली जप्त
कोणतीही अॅम्ब्युलन्स अडकून राहू नये म्हणून हा हेल्पलाईन नंबर सुरु कऱण्यात आला आहे

देशात करोनाचा फैलाव झपाट्याने होत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत आहे. त्यात रुग्णांची लूट होत असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शन असो की ऑक्सिजन सिलेंडर सर्वच ठिकाणी लूट सुरु असल्याचं दिसत आहे. रुग्णालयांची बिलंही लाखोंच्या घरात येत असल्याने सामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. अशातच दिल्लीत रुग्णांची लूट करण्याऱ्या रुग्णवाहिका चालकाला पोलिसांनी दणका दिला आहे. अवघ्या दोन किलोमीटर अंतरासाठी त्याने रुग्णांच्या नातेवाईकांना वेठीस धरलं होतं.

करोना रुग्णाला अपोलो रुग्णालयातून होली फॅमिली रुग्णालयात जाण्यास सांगण्यात आलं होतं. हे अंतर अवघ्या दोन किलोमीटर इतकंच आहे. यासाठी नातेवाईकांनी रुग्णवाहिकेचा बंदोबस्त केला. मात्र त्या रुग्णवाहिका चालकाने या दोन किलोमीटर अंतरासाठी ८,५०० रुपयांची मागणी केली. रुग्णाच्या नातेवाईकांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो काही मानायला तयार नव्हता. त्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात त्यांनी तात्काळ घटनास्थळी येत रुग्णवाहिका चालकाला अटक केली. तसेच त्याची रुग्णवाहिकाही जप्त केली आहे.

दिल्ली पोलिसांनी यासाठी एक हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. कोणत्याही प्रकारची लूट होत असल्यास फोन करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. जास्त पैसे उकळणे, करोनाची खोटी औषधं देणे, उपकरणांचा काळाबाजार करणे यासारख्या समस्यांना सामोरं जात असल्यास तक्रार करण्याची विनंती केली आहे.

करोना संकटात एकमेकांना मदतीचा हात देण्याऐवजी सर्रास लूट सुरु असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे अधिच संकाटात सापडलेले रुग्णांचे नातेवाईक हवालदिल होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2021 6:00 pm

Web Title: delhi police have arrested an ambulance driver and seized his ambulance for looting corona patient rmt 84
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 “आता पाणी डोक्यावरून गेलंय, आजच्या आज ऑक्सिजन पुरवा”, उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला फटकारलं!
2 दिलासादायक! ‘स्पुटनिक व्ही’ लसीची पहिली खेप भारतात दाखल
3 Good News! नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात विक्रमी GST कलेक्शन
Just Now!
X