News Flash

वाजपेयींच्या अंत्ययात्रेनिमित्त दिल्लीतील वाहतुकीच्या मार्गांमध्ये बदल

दिल्लीत शुक्रवारी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची अंत्ययात्रा निघणार असून या काळात दिल्लीतील काही महत्वाच्या मार्गांवरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

वाजपेयींच्या अंत्ययात्रेनिमित्त दिल्लीतील वाहतुकीच्या मार्गांमध्ये बदल

दिल्लीत शुक्रवारी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची अंत्ययात्रा निघणार असून या काळात दिल्लीतील काही महत्वाच्या मार्गांवरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. कोणते मार्ग वाहतुकीसाठी बंद असतील याच्या सूचना दिल्ली पोलिसांनी जाहीर केल्या आहेत. मध्य दिल्लीकडे जाणारे जवळपास सर्वच मार्ग सकाळी ८ वाजल्यापासून बंद राहणार आहेत. यामध्ये कृष्णा मेमन मार्ग, अकबर रोड, जनपथ आणि इंडिया गेट या मार्गांचा समावेश आहे. त्याचबरोबर सामान्य नागरिकांसाठी पुढील मार्गही बंद राहणार आहेत.

कृष्ण मेमन मार्ग, सुनहरी बाग रोड, तुघलक रोड, अकबर रोड, टीस जानुअरी मार्ग, जनपथ (क्लॅरिडगेस हॉटेल ते विंडसर प्लेस), मानसिंग रोड, सी-हेक्झॅगॉन (शाहजहान रोड ते टिळक मार्ग), राजपथ रोड (मानसिंग रोडपासून सी-हेक्झॅग़ॉन), अशोक रोड (विंडसर प्लेस ते सी-हेक्झॅग़ॉन), ११ केजी मार्ग (फिरोज शाह रोड ते सी-हेक्झॅग़ॉन), कोपर्निकस मार्ग (मंडी हाऊस ते सी-हेक्झॅग़ॉन), शहाजहान रोड, झाकिर हुसैन मार्ग (एसबीएम ते इंडिया गेट), टिळक मार्ग (सी-हेक्झॅग़ॉन ते टिळक ब्रिज), भगवान दास रोड, सिकंदरा रोड, मथुरा रोड (भैरोन मार्ग टी पॉइंट ते डब्लू पॉइंट), बीएसझेड मार्ग (टिळक ब्रिज ते दिल्ली गेट), आय पी मार्ग, डीडीयू मार्ग, जेएलएन मार्ग (राजघाट ते दिल्ली गेट), रिंग रोड (इंदिरा गांधी स्टेडिअम ते यमुना बाजार), नेताजी सुभाषचंद्र मार्ग (दिल्ली गेट ते छट्टा रेल), निशाद राज मार्ग (नेताजी सुभाषचंद्र मार्ग ते शांतीवन).

प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग : उत्तर-दक्षिण प्रवेश

पहिला पर्यायी मार्ग : ऑरोबिंदो मार्ग-सफदरजंग रोड-मदर तेरेसा क्रिसेंट-पार्क स्ट्रीट-मंदिर मार्ग-पांचकुइन मार्ग, रानी झांसी रोड आणि उत्तर दिल्लीत प्रवेश आणि उलटी वाहतूक.

दुसरा पर्यायी मार्ग : कनॉट प्लेसला पोहोचण्यासाठी-मिंटो रोड-भावभुती मार्ग-अजमेरी गेट-श्रद्धानंद मार्ग-लोहोरी गेट चौक-नया बाझार-पिली कोठी-एस. पी मुखर्जी मार्ग आणि उत्तर दिल्लीत प्रवेश आणि उलटी वाहतूक.

तिसरा पर्यायी मार्ग : रिंग रोड आयएसबीटी (काश्मीरी गेट)-सलिम गड बायपोस रोड (अप्पर रिंग रोड)-आयपी इस्टेट उड्डाणपूल आणि उलट दिशेने.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2018 6:33 am

Web Title: delhi police issues traffic advisory for vajpayees final journey
Next Stories
1 उत्तर प्रदेशातील प्रत्येक नदीत वाजपेयींच्या अस्थींचे विसर्जन करणार : योगी आदित्यनाथ
2 Kerala Floods: बळींची संख्या 164, एकूण 8,000 कोटींचे नुकसान
3 अर्धविराम आणि पूर्णविराम..
Just Now!
X