News Flash

डबल बेडच्या बॉक्समध्ये चुकून लॉक झाल्या ८४ वर्षांच्या आजी, नातीने CCTV मध्ये बघितलं दृष्य आणि…

84 वर्षांची आपली आजी घरातील डबल बेडच्या बॉक्समध्ये चुकून लॉक झाल्याचं एका नातीने सीसीटीव्हीद्वारे पाहिलं...

डबल बेडच्या बॉक्समध्ये चुकून लॉक झाल्या ८४ वर्षांच्या आजी, नातीने CCTV मध्ये बघितलं दृष्य आणि…
(फोटो सौजन्य : दिल्ली पोलिस )

84 वर्षांची आपली आजी घरातील डबल बेडच्या बॉक्समध्ये चुकून लॉक झाल्याचं एका नातीने सीसीटीव्हीद्वारे पाहिलं. लगेच तिने पोलिसांना फोन केला, पोलिसांनीही तातडीने पावलं उचलली आणि आजींची सुखरूप सुटका केली.

राजधानी दिल्लीच्या प्रसाद नगरमधील ही घटना आहे. पोलिसांनी सतर्कता दाखवल्यामुळे इथे स्वरोश कोहली या एका वृद्ध महिलेचा जीव वाचला. काही वर्षांपूर्वी पती आणि मुलाचा मृत्यू झाल्यामुळे स्वरोश कोहली एकट्याच राहतात.

गुरूवारी दुपारी 3:45 च्या सुमारास दिल्लीच्या अलकनंदा परिसरातून नॅन्सी नावाच्या महिलेने प्रसाद नगर पोलिसांना फोन केला. तिची 84 वर्षांची आजी करोलबागच्या देव नगरमध्ये राहते असं तिने पोलिसांनी सांगितलं. आजीच्या देखभालीसाठी आणि लक्ष ठेवण्यासाठी घरात सीसीटीव्ही लावला आहे. तो सीसीटीव्ही नॅन्सी मोबाइलवरुन बघत असते. दुपारच्या वेळेस डबल बेडचा बॉक्स उघडत असताना आजीचा तोल गेला आणि ती बॉक्समध्ये पडली व लॉक झाली असे नॅन्सीने पोलिसांना फोनवर सांगितले.

त्यावर पोलिसांनी तातडीने पावलं उचलली आणि काही मिनिटांतच दरवाजा तोडून पोलीस कोहली यांच्या घरी पोहोचले व त्यांची सुखरुप सुटका केली. जवळपास 10 मिनिटे या आजी बॉक्समध्ये अडकून होत्या.  थोड्याचवेळात नॅन्सी आणि तिचे पतीही घटनास्थळी पोहोचले. एका फोनवर तातडीने पावलं उचलणाऱ्या पोलिसांचे त्यांनी आभार मानले. वय जास्त असल्याने आणि अशक्तपणामुळे त्यांना बॉक्सच्या बाहेर येता येत नव्हतं, अशी माहिती यावेळी पोलिसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2020 9:51 am

Web Title: delhi police rescues 84 yr old woman after she accidentally locks herself in bed box sas 89
Next Stories
1 राजनाथ सिंह लडाख दौऱ्यावर, पॅरा कमांडोजनी दाखवलं कौशल्य
2 जम्मू-काश्मीर : कुलगाममध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा, चकमक सुरू
3 संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लडाख व जम्मू-काश्मीर दौऱ्यावर
Just Now!
X