17 October 2019

News Flash

रॅनबॅक्सीचे माजी प्रवर्तक शिविंदर सिंग यांना अटक

रॅनबॅक्सी लॅबोरटरीजचे माजी प्रवर्तक शिविंदर मोहन सिंग यांना दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी संध्याकाळी अटक केली.

आर्थिक घोटाळा प्रकरणात रॅनबॅक्सी लॅबोरटरीजचे माजी प्रवर्तक शिविंदर मोहन सिंग यांना दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी संध्याकाळी अटक केली. रेलिगेअर फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीच्या तक्रारीवरुन अन्य तिघांसह शिविंदर सिंग यांना अटक करण्यात आली.

रेलिगेअरचे माजी चेअरमन सुनील गोधवानी यांना सुद्धा अटक करण्यात आली आहे. रेलिगेअरने शिविंदर सिंग आणि अन्य तिघांवर ७४० कोटी रुपयांच्या निधीमध्ये अफरातफर केल्याच्या आरोप केला आहे.

First Published on October 10, 2019 7:49 pm

Web Title: delhi polices eow arrests former ranbaxy promoter shivinder singh dmp 82