News Flash

पोस्टर्सवरून भाजप नेते हद्दपार

नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होतील तेव्हा होतील, पण भारतीय जनता पक्षासाठी मात्र सध्या तरी ते सर्वात शक्तिशाली नेते

| November 6, 2013 04:31 am

नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होतील तेव्हा होतील, पण भारतीय जनता पक्षासाठी मात्र  सध्या तरी ते सर्वात शक्तिशाली नेते झाले आहेत. मोदींच्या एकछत्री अमलामुळे जनसंघ ते भाजपच्या जडणघडणीत योगदान असणाऱ्या अनेक  राष्ट्रीय नेत्यांना पक्षाच्या पोस्टरवरदेखील स्थान नााही.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दिल्ली प्रदेश भाजपकडून लावण्यात आलेल्या पोस्टर्सवर मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार डॉ. हर्षवर्धन व नरेंद्र मोदीवगळता एकाही नेत्याचे छायाचित्र नाही.
लालकृष्ण अडवाणी अडगळीत पडले असले तरी दिल्ली प्रभारी नितीन गडकरी यांनादेखील मोदी व हर्षवर्धन यांच्या रांगेत स्थान मिळालेले नाही. विधानसभा निवडणुका घोषित झाल्यानंतर प्रदेश भाजपने जागोजागी पोस्टर्स लावले होते.
त्यावर प्रदेशाध्यक्ष विजय गोयल यांच्यासमवेत मोदी, अडवाणी, लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते अरुण जेटली आदी नेत्यांची छायात्रित्रे होती. मात्र हर्षवर्धन यांना मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी घोषित झाल्यानंतर शहर बस स्टॉप, रस्त्यांच्या कडेला लावण्यात आलेल्या पोस्टर्सवर फक्त मोदींचेच छायाचित्र आहे.
    
हर्षवर्धन यांची निळाई
व्यवसायाने डॉक्टर असलेल्या हर्षवर्धन यांना निळा रंग खूप आवडतो. इतका की, दिल्लीत लावलेल्या पोस्टर्सवर डॉ. हर्षवर्धन यांचे निळ्या शर्टमधील छायाचित्र आहे संकेतस्थळावरच नव्हे तर प्रचारादरम्यानही ते निळ्या रंगाची छटा असलेले शर्ट परिधान करतात. कुणी म्हणेल ही तर अंधश्रद्धा असेल. डॉ. हर्षवर्धन मात्र याचा इन्कार करतात. ते म्हणतात, निळ्या रंगाचे आकाश असते. तेथे ईश्वराचा वास असतो. हर्षवर्धन यांचे अनुकरण आता त्यांचे कार्येकर्तेही करायला लागले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2013 4:31 am

Web Title: delhi poll bjp leaders expelled from delhi election posters
Next Stories
1 राजस्थानमध्ये प्रत्येक मतदारामागे २० रुपये खर्च
2 ‘गोध्रा प्रकरणी मोदींचे हात कधीच धुतले जाणार नाहीत’
3 चौहान, अजयसिंह यांचे अर्ज दाखल
Just Now!
X