27 February 2021

News Flash

#DelhiRains: विजांच्या कडकडाटांसहीत दिल्लीमध्ये गारांचा पाऊस, जनजीवन विस्कळीत

अनेक जागी पाणी साचल्याने वाहतुककोंडी झाली

दिल्लीमध्ये पाऊस

राजधानी दिल्ली आणि एनसीआर परिसरामध्ये रात्रीपासून गारांसह पाऊस पडत आहे. जोरदार पाऊस, वादळी वारे आणि गारांचा वर्षाव झाल्याने दिल्लीकरांची मंगळवारची सकाळ रोजसारखी नव्हती. वातावरण ढगाळ असल्याने सकाळच्या नऊ वाजताही पहाटेच्या साडेपाच वाजल्यासारखा अंधार दिल्लीवर पसरला होता असे ट्विटस अनेकांनी केले आहेत. रात्रभर विजांच्या कडकडाटासहत रिमझीम पाऊस पडत होता. फरिदाबाद, गुरूग्राम आणि नोएडामधील हवेचा स्थर खालावला. अनेकांनी सोशल नेटवर्किंग साईटवरुन सकाळपासूनच या पावसासंदर्भातील पोस्ट केल्या. यामध्ये अगदी दृष्यमानता कमी झाल्यापासून ते हवेतील गारव्याचा आनंद घेत असल्याचेही अनेक दिल्लीकरांनी सांगितले. मात्र अवेळी आलेल्या या पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे.

पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतुककोंडी झाली. दिल्ली वाहतूक पोलीस ट्विटवरून ठिकठिकाणच्या वाहतुककोंडीचे अपडेट्स देत आहेत. मथुरा रोड ते राजापुरी चौक मार्गावर पालम उड्डाणपुलाजवळ पाणी साचल्याने वाहतुककोंडी झाली होती. त्याचबरोबर अवेळी पावसामुळे समलखा रेड लाइट, आरटीआर टी-पॉइण्ट, भैरव मार्ग रेल्वे पुलाजवळ पाणी साठल्याने वाहनांची वाहतूक संथ गतीने होत होती.

काल संध्याकाळपासूनच दिल्लीमध्ये हलका पाऊस पडत होता. रविवारी हा २०१२ नंतरचा जानेवारीमधील सर्वात उष्ण दिवस ठरला त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पावसाला सुरुवात झाली. यामुळे वातावरणात अचानक गारवा निर्माण झाला. दिल्लीचे किमान तापमान ११.५ डिग्री सेल्सियस तर कमाल तापमान २२.६ डिग्री सेल्सियस इतके नोंदवले गेले.

सकाळपासून अगदी गारांचा पाऊस पडत असल्याने दिल्लीकरांनी थेट ट्विटवरून याचे फोटो शेअर केले आहेत. #DelhiRains हा हॅशटॅग ट्रेण्ड होताना दिसत आहे. हा हॅशटॅग वापरून अनेकांना गारांचे फोटो ट्विटवर शेअर केले आहेत.

गारा

पावसाची झलक

सर्वोच्च न्यायालयाचा परिसर

गुरुग्राममधील पाऊस

सकाळी सव्वा अकराचे दृष्य

आज दिवसभर दिल्लीतील वातावरण ढगाळ राहणार असल्याची शक्यता स्कायमेटने व्यक्त केली आहे. संध्याकाळपर्यंत वातावरण सामान्य होण्याची शक्यता असली तरी दिवसभर हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो असं स्कायमेटने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2019 11:22 am

Web Title: delhi rains weather updates today hailstorm heavy rains traffic jams
Next Stories
1 विधानसभेत गायीच्या मृत्यूचा उल्लेख करताना मुस्लिम आमदाराला अश्रू अनावर
2 EVM Hacking: सय्यद शुजाच्या पत्रकार परिषदेत कपिल सिब्बलही उपस्थित, फोटो व्हायरल
3 राहुल गांधी नांदेडमधून लोकसभा निवडणूक लढवणार?
Just Now!
X