देशात सध्या करोना संसर्गाचा विस्फोट झाल्याचे चित्र आहे. दररोज लाखांच्या संख्येत नवीन करोनाबाधित वाढत आहेत. रूग्णांचा मृत्यू संख्येही मोठी भर पडत आहे. परिणामी आरोग्यंत्रणा कोलमडत आहेत. रूग्णालयांमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, बेड, रेमडेसिविर व लसींचा तुटवडा निर्माण होत आहे. यामुळे रूग्णांचे हाल होत असून, रूग्णांच्या नातेवाईकांना देखील विविध अडचणींना समोरं जावं लागत आहे. ही वस्तूस्थिती दर्शवणारे उदाहरण दिल्लीत दिसून आले आहे.

रजन अहलुवालिया (वय-३८) या व्यक्तीच्या वडिलांना करोना संसर्ग झाल्याने, दिल्लीतील रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र या ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालेला असल्याने व वडिलांच्या उपचारासाठी ऑक्सिजनची नितांत आवश्यकता असल्याने, रजत यांनी धावपळ करत, जवळपास एक किलोमीटर लांब रांगेत उभा राहून, स्वतःच्या खांद्यावर दहा लिटरचे ऑक्सिजन सिलिंडर घेऊन ते रूग्णालयात आणले.

रूग्णालायात सध्या ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स व औषधींच्या तुटवड्याबरोबरच वैद्यकीय कर्मचाऱ्यांची देखील कमतरता निर्माण झालेली आहे. अशावेळी रूग्णांच्या नातेवाईकांनाच आपल्या रूग्णांचा जीव वाचवण्यासाठी धडपड करावी लागत आहे.

“परिस्थिती हाताळता येत नसेल तर सांगा, केंद्राकडे जबाबदारी सोपवू”- उच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला सुनावलं!

”संपूर्ण दहा लिटरचे सिलिंडर आहे. माझा खांदा सोलून निघाल आहे, लांबच लांब रांगेत उभा राहून सिलिंडर भरून आणले आहे. तेव्हा कुठं मला ऑक्सिजन सिलिंडर मिळाला आहे.” असं रजत यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितलं आहे.

रजत यांचे वडील दिल्लीतील पेंटामेड रूग्णालयात अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत आहेत. रूग्णालयातील ऑक्सिजन साठा अपुरा पडत असून, ऑक्सिजन टँक पुन्हा भरला जात नसल्याने रूग्णांची परिस्थिती चिंताजनक झाली आहे. परिणामी रूग्णालय प्रशासनास अनेकांना स्वतः ऑक्सिजनची व्यवस्था करा असं सांगण्याची वेळ आली आहे.

केजरीवाल यांची मोठी घोषणा: दिल्लीत महिन्याभरात ४४ ऑक्सिजन प्लांट्स उभारणार!

वडिलांसाठी ऑक्सिन मिळावा म्हणून रजत हे सुमारे ६० किलोमीटर अंतरावरील हरियाणामधील मानसेर येथे देखील पोहचले होते. तसेच, रजत अहलुवालिया यांनी सांगितले की, त्यांच्या आसपासचे लोकं प्रत्येक गोष्टीसाठी झगडत आहेत. रेमडेसिविरच्या एका इंजेक्शनची किंमत ५ हजार ४०० रुपये आहे, पण मला ते काळ्याबाजारातून ३५ हजार रुपयांना घ्यावं लागलं.