13 December 2017

News Flash

दिल्ली बलात्कार प्रकरणातील आरोपी विनय शर्माने स्वत:हून केली फाशीची मागणी

दिल्ली सामुहीक बलात्कार प्रकरणातील आरोपी विनय शर्मा याला दिल्ली पोलिसांमार्फत अटक करण्यात आली. या

दिल्ली | Updated: December 19, 2012 5:51 AM

दिल्ली सामुहीक बलात्कार प्रकरणातील आरोपी विनय शर्मा याला दिल्ली पोलिसांमार्फत अटक करण्यात आली. या प्रकरणातील आरोपींना साकेत न्यायालयात हजर करण्यात आले असता गुन्हा मान्य करत आरोपी विनय शर्मा याने आपल्याला फाशी द्यावी अशी मागणी केली. त्याचबरोबर आपण घृणास्पद कृत्य केल्याचे मान्य करत विनय शर्मा याने ओळख परेड करण्यास नकार दिला. यातील पवन गुप्ता आणि विनय शर्मा या दोन आरोपींना चार दिवसांसाठी पोलिस कोठडीत ठेवण्यात येणार आहे. तर मुकेश सिंग याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी फर्मावण्यात आली आहे. प्रकरणातील मुख्य आरोपी राम सिंग याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आज(बुधवार) आणखी दोन आरोपी अक्षय ठाकूर आणि राजू यांना बिहार मध्ये औरंगाबाद जिल्ह्यात अटक करण्यात आली आहे.

First Published on December 19, 2012 5:51 am

Web Title: delhi rape case vinay sharma wants noose
टॅग Noose,Rape,Vinay Sharma