News Flash

दिल्लीनं मुंबईला टाकलं मागे; बाहेरून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला क्वारंटाइनची सक्ती

एका दिवसात आढळले सर्वाधिक रुग्ण

रुग्णांच्या घशातील स्वॅब घेताना डॉक्टर. (संग्रहित छायाचित्र)

देशात करोनाचा शिरकाव झाल्यानंतर पहिल्यांदाच राजधानी दिल्लीनं देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला मागे टाकलं आहे. बुधवारी मुंबईपेक्षा जास्त रुग्ण दिल्लीत आढळून आले आहेत. मुंबईत दिवसभरात १,२७६ रुग्ण आढळून आले, तर दिल्लीत एकाच दिवसात १,५१३ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे दिल्लीत करोना बाधितांच्या आकड्या मोठी वाढ झाली आहे.

गेल्या आठवड्यापासून दिल्लीत दिवसाला आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. दिल्लीत दररोज सरासरी १,००० पेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे सर्वाधिक रुग्णांची वाढ होणाऱ्या पहिल्या पाच राज्यात दिल्लीचा समावेश झाला आहे. सध्या दिल्लीत २३ हजार ६४५ रुग्ण आहेत. यापैकी ९ हजार ५०० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

एका आठवड्यापूर्वी दिल्लीत आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसाला ५०० ते ८०० च्या दरम्यान होती. दुसरीकडे मुंबईत तीन आठवड्यांपासून दिवसाला आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या १२,०० पेक्षा जास्त आहे. मुंबईत एका दिवसात सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याचा आकडा १,७५० इतकी आहे.

दरम्यान, करोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विमान प्रवासच नाही, तर रेल्वे आणि वाहनांनी येणाऱ्या प्रवाशांनाही कमीत कमी एक आठवडा क्वारंटाइन राहणे सक्तीचे केले आहे. त्याचबरोबर दिल्लीनं हरयाणा राज्याला लागून असलेली सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एका दिवसापूर्वीच ही सीमा खुली करण्यात आली होती. सध्या हरयाणात प्रचंड वेगानं करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मागील दोन आठवड्यात हरयाणातील संख्या दुप्पट झाली आहे. २७ मे रोजी हरयाणातील रुग्णसंख्या १ हजार ३८१ होती. बुधवारी ही संख्या २ हजार ९५४ इतकी झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2020 4:01 pm

Web Title: delhi reports more cases than mumbai bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 सायकल दिनी अॅटलस फॅक्टरी बंद, हजारपेक्षा जास्त कामगार बेरोजगार
2 “तुम्ही करोनाऐवजी अर्थव्यवस्थेचा आलेखच खाली आणला”; राजीव बजाज यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3 “नोव्हेंबरमध्येच भारतात करोनाने केला होता प्रवेश”; शास्त्रज्ञांचा खळबळजनक दावा
Just Now!
X