25 September 2020

News Flash

धक्कादायक ! शाळेची फी भरली नाही चिमुकल्या विद्यार्थिनींना ठेवलं कोंडून

विद्यार्थिनींचे पालक आपल्या मुलींना घरी घेऊन जाण्यासाठी शाळेत गेल्यानंतर मुली कुठेही दिसल्या नाहीत

(फोटो क्रेडिट - जनसत्ता)

शाळेची फी भरली नाही म्हणून केजीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींना कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दिल्लीच्या चांदनी चौक परिसरात राबिया गर्ल्स पब्लिक स्कूलमध्ये हा प्रकार घडला आहे. दरम्यान, प्रकरणाची माहिती मिळताच दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी अधिकाऱ्यांना शाळेविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ‘विद्यार्थ्यांना कोंडून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर धक्का बसला, तातडीने प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत’, अशी माहिती त्यांन ीट्विटरद्वारे दिली.


मिळालेल्या माहितीनुसार, येथील 16 विद्यार्थिनींना शाळेची फी थकवल्यामुळे सकाळी सात वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत डांबून ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. काही माध्यमांनी 59 विद्यार्थिनींना डांबून ठेवल्याचंही वृत्त दिलं आहे. विद्यार्थिनींचे पालक आपल्या मुलींना घरी घेऊन जाण्यासाठी शाळेत गेल्यानंतर मुली कुठेही दिसल्या नाहीत. पालकांनी याबाबत चौकशी केल्यानंतर पालकांच्या सर्व पकार लक्षात आला आणि या सर्व विद्यार्थिनींना शाळेच्या बेसमेंटमध्ये बंद करुन ठेवल्याचे पालकांना समजले. परिणामी पालकांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी शाळा प्रशासनाला धारेवर धरत याबाबत जाब विचारला. शाळा प्रशासनाने तब्बल 5 तास या विद्यार्थिनींना डांबून ठेवलं होतं. त्यांना या दरम्यान शौचालयास जाण्यास किंवा काही खाण्यापिण्यासही मनाई करण्यात आली होती, अशी माहिती आहे.

या प्रकरणाचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलीस स्थानकात या प्रकरणाची तक्रार करण्यात आली असून पोलिसांनी घटनेची चौकशी सुरू केल्याची माहिती आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2018 1:30 pm

Web Title: delhi school locked up girls for not paying fee
Next Stories
1 काँग्रेसच्या रणनितीमध्ये बदल, राहुल गांधी घेणार मुस्लीम विचारवंतांची भेट
2 World Population Day: …तर चीनची लोकसंख्या भारतीय लोकसंख्येच्या ६५ टक्केच असेल!
3 सरकारी रुग्णालयाने शववाहिनी नाकारल्याने मुलाने आईचा मृतदेह नेला बाईकवरुन
Just Now!
X