08 August 2020

News Flash

धक्कादायक! पगार मागितला म्हणून मालकीणीने कर्मचाऱ्याच्या अंगावर सोडला कुत्रा, तोंडावर १५ टाके

पगार मागणाऱ्या कर्मचाऱ्यावर कुत्रा सोडल्याचा धक्कादायक प्रकार

संग्रहित

दिल्ली पोलिसांनी मंगळवारी एका स्पाच्या मालकीणीला अटक केली आहे. पगार मागितला म्हणून तिने आपल्या महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर कुत्रा सोडल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दक्षिण दिल्लीमधील मालविया नगर परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

११ जून रोजी ही घटना घडली असून कुत्र्याच्या हल्ल्यात महिला कर्मचारी गंभीर जखमी झाली असून चेहऱ्यावर आणि मानेवर १५ टाके लागले आहेत. पीडित कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “लॉकडाउन जाही होण्याआधी दीड महिना आपण स्पामध्ये काम केलं होतं. २२ मार्च रोजी आपण नोकरी सोडली होती”.

पीडित कर्मचाऱ्याने तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, ११ जून रोजी मालकीण रजनी यांच्याकडे थकीत पगारासंबंधी विचारलं होतं. यावेळी तिने आपल्याला घरी बोलावलं. घरी पोहोचल्यानंतर पैसे हवे असतील तर घऱकाम करण्यास सांगितलं. नकार दिला असताना रजनी यांनी धमकावलं आणि अंगावर कुत्रा सोडण्याची धमकी दिली.

“महिलेने तक्रार दाखल केली असून रजनी यांनी पगार मागितला असता हल्ला करण्यासाठी कुत्र्याला अंगावर सोडलं. यानंतर गुन्हा दाखल करत आरोपीला अटक कऱण्यात आलं आहे,” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पीडित कर्मचारी हल्ल्यात गंभीर जखमी झाली असून चेहरा आणि मानेवर असे एकूण १५ टाके लागले आहेत. आपला पगार देण्यास नकार का दिला याची कल्पना नसल्याचं तिने सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2020 9:51 am

Web Title: delhi spa owner releases dog on staff for demanding salary sgy 87
Next Stories
1 ICICI बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी ‘गुड न्यूज’, करोना संकटात काम केल्याचं मिळालं मोठं ‘गिफ्ट’
2 उत्तराखंडच्या पर्यटनमंत्र्यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना पाठवलं ‘रामायण’; म्हणाले…
3 वडिलांकडून होणाऱ्या छळाला घाबरायचे ट्रम्प; भाचीनं पुस्तकामधून केला दावा
Just Now!
X