19 September 2020

News Flash

दिल्लीतील लाल किल्ला परिसरात आयसिसच्या दोन दहशतवाद्यांना अटक

दिल्लीतील लाल किल्ला परिसरात दोन दहशतवाद्यांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने ही कारवाई केली आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

दिल्लीतील लाल किल्ला परिसरात दोन दहशतवाद्यांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने ही कारवाई केली असून सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या परिसरात दहशतवाद्यांना अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.

दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने लाल किल्ला परिसरातील काश्मिरी गेट येथून परवेझ रशिद आणि जमशेद जहूर या दोन जणांना अटक केली. हे दोघेही आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत. दोघेही मूळच्या शोपियाँ जिल्ह्यातील रहिवासी आहेत. दोघांपैकी एकाच्या नातेवाईकाचा चकमकीत मृत्यू झाला होता. त्यानंतर दोघेही दहशतवादी संघटनेत सामील झाले. या दोघांचा काय कट होता, ते आयसिसच्या संपर्कात कसे आले याचा तपशील उघड झालेला नाही.

सविस्तर वृत्त लवकरच…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2018 3:52 pm

Web Title: delhi special cell police arrested two terrorists near red fort
Next Stories
1 अॅट्रॉसिटी कायद्यातील ‘त्या’ सुधारणांविरोधात सुप्रीम कोर्टाची केंद्राला नोटीस
2 सीमेवरील सैनिकांच्या बलिदानाचा बदला घेणार; पाकिस्तान लष्करप्रमुखांची धमकी
3 समलैंगिकतेसाठी मृत्यूदंड देणाऱ्या आणि पाठिंबा देणाऱ्या देशांची यादी
Just Now!
X